Friday, April 26, 2024
Homeनगरसध्या आम्ही काय करतो ? : जिल्हा परिषद अध्यक्षांचा प्रशासनाशी समन्वय

सध्या आम्ही काय करतो ? : जिल्हा परिषद अध्यक्षांचा प्रशासनाशी समन्वय

संसाराबरोबरच राजश्रीताईच्या खांद्यावर जिल्ह्याचा गाडा जिल्हा परिषद अध्यक्ष घुले यांचा दिनक्रम : पती चंद्रशेखर वाचनासोबत कार्यकर्त्यांच्या संपर्कात

अहमदनगर (प्रतिनिधी) – स्त्री कितीही मोठ्या पदावर असली, तरी तिला संसाराचा गाडा ओढावा लागतोच. काहीशी अशीच अवस्था जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांची आहे. घरातील कोणाला काय हवे नको, हे पाहण्यासोबतच सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीत संपूर्ण जिल्ह्यात खबरदारीचा उपाय ठेवण्याच्या सूचना वजा आदेश देण्यासोबत जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात राहण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. याच सोबत कुटूंबातील कोणाला काय हवे, काय नको, याची खबरदारी घेण्याचे काम त्यांना करावे लागत आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री ताई घुले यांचा विद्यमान परिस्थितील दिनक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, सकाळी कुटूंबाची जेवणापासून अन्य सोय पाहण्यासोबतच त्यानंतर दुपारपर्यंत जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांना सुचना देणे, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन यांच्या संपर्कात राहण्याचे काम करावे लागत आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हाभर लक्ष ठेवावे, दिवसभर घडणार्‍या घटनांचा आढावा घेवून आवश्यक त्या सूचना देण्याचे काम अध्यक्षा राजश्रीताई करत आहेत. यासोबत घरातील लहान मोठ्या गरजा आणि त्यांच्या आवडीनुसार जेवण तयार करणे, नातेवाईक, कार्यकर्ते, मतदारसंघासोबत सर्वांची काळजी घेण्याचे काम अध्यक्षा घुले यांच्याकडून सध्या सुरू आहे.

घरात पती माजी आमदार चंद्रशेखर घुले, मुलगी आणि अन्य नातेवाईक असून त्यांच्यासोबत घरातील कामात वेळ कसा जातो, हे कळत नसल्याचे सांगत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्‍न आहे. यासाठी नागरिकांनी सरकारच्या सुचनाचे पालन करावे, घरातून शक्यतो बाहेर पडून नयेत, वारंवार हात धुवावेत, घरातील वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी, असे आवाहन अध्यक्षा घुले यांनी केले आहे.

दरम्यान, पती चंद्रशेखर घुले हे सध्या मिळालेल्या वेळात कार्यकर्त्यांशी हितगुज करत असून मतदारासंघातील आरोग्य स्थितीची माहिती घेत आहेत. मिळालेल्या वेळात कुटूंबासोबत घालविण्यासोबतच वाचनात व्यस्त आहेत. कोरोना आजार गंभीर असून सर्वांनी स्वत:ची काळजी स्वतः घ्यावी, असे आवाहन चंद्रशेखर घुले यांनी केले आहे.

लवकर जिल्ह्यासह राज्यातून कोरोना हद्दपार व्हावा, सर्वांचे आरोग्य चांगले राहवे, अशी अपेक्षा आहे. तसेच नागरिकांनी घरात राहून आपल्या कुटूंबाला जास्ती जास्त वेळ द्यावा, सरकारच्या सुचनाचे पालन करावे.

– राजश्रीताई घुले, अध्यक्षा.
   नगर जिल्हा परिषद.

- Advertisment -

ताज्या बातम्या