Thursday, April 25, 2024
Homeनगररांजणखोलचे दोघे गावठी कट्ट्यासह दत्तनगरला जेरबंद

रांजणखोलचे दोघे गावठी कट्ट्यासह दत्तनगरला जेरबंद

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- दत्तनगर परिसरात गावठी कट्टासह दोन जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे पोलीस हेडकॉन्स्टेबल जालिंदर लोंढे, पोलीस नाईक संजय दुधाडे, हरिष पानसंबळ, सुनील दिघे, किशोर जाधव, अर्जुन पोकळे आदी काल दुपारी दीडच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवरून कोणी मजूर जा-ये करीत आहेत का? हे पाहण्यासाठी गेले होते.

त्यावेळी त्यांना एमआयडीसीकडुन सुतगिरणीकडे जाणार्‍या रोडने रेल्वेलाईनच्या कडेने समोरुन वेगात एक मोटारसायकलवर दोघेजण सुतगिरणीकडून एमआयडीसीकडे येताना दिसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना गाडी थांबवून थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी जागेवरच मोटारसायकल वळवून पुन्हा सुतगिरणीकडे पळ काढला. पोलिसांनी या मोटारसायकलचा पाठलाग केला. त्यावेळी रस्त्यावरील खड्ड्यात मोटारसायकल आदळली व हे दोघेजण मोटारसायकलसह खाली पडले.

- Advertisement -

मात्र, त्यांनी मोटारसायकल जागेवरच सोडून रेल्वे रुळ ओलांडून पलीकडे पळू लागले. पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून रईस शेरखान पठाण (वय 23), समीर शेरखान पठाण (वय 28, रा. कोंबडगल्ली, रांजणखोल ता. राहाता) यांना ताब्यात घेतले. यातील रईस पठाण हद्दपार आहे. त्यांची झडती घेतली असता समीर शेरखान पठाण याच्याकडे एक गावठी कट्टा व त्यामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व 65 हजार रुपये किमतीची विना नंबरची युनिकॉर्न गाडी पोलिसांनी जप्त केली.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल रघुवीर ओंकार कारखिले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रईस शेरखान पठाण (वय-23), समीर शेरखान पठाण (वय-28, दोघे रा- कोंबडगल्ली, रांजणखोल ता- राहाता) यांच्याविरुद्ध गुन्हा रजि.नं. 928/2020 भादंवि. भारतीय हत्यार कायदा कलम 3,7,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई बहाकर हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या