Saturday, April 27, 2024
Homeनगरकोपरगाव नगरसेवकाच्या दिवट्याचे सावळीविहीर हॉटेलात रंगेल चाळे

कोपरगाव नगरसेवकाच्या दिवट्याचे सावळीविहीर हॉटेलात रंगेल चाळे

शिर्डी (प्रतिनिधी) – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व ते प्रयत्न करीत आहे, सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. सर्व बंद आहे, मात्र कोपरगाव नगर पालिकेचे अपक्ष नगरसेवक महेमूद सैय्यद यांचा मुलगा मोसिन सैय्यद याला एका 27 वर्षीय महिलेशी सावळीविहिर येथील हॉटेलात अय्याशी करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिर्डी पोलिसांनी दोघांसह हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे.

राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथे हॉटेल वेलकम व एसार रिसोर्टमध्ये दिनांक 29 रोजी दुपारी काही मुले व मुली आल्याची उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना खबर्‍या मार्फत माहिती मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक औताडे व सपोनि घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक त्वरित सावळीविहीर फाटा येथे हॉटेल वेलकममध्ये पाठवले. या पोलीस पथकाने या हॉटेलच्या रूमची झाडाझडती घेतली असता तेेथे एक जोडपे मिळून आले.

- Advertisement -

आरोपी मोसिन मोहम्मद सय्यद, रा.गांधीनगर, कोपरगाव हा मोटरसायकलवरून विनापरवाना कोपरगावहून सावळीविहीर फाटा येथे येऊन त्यांनी हॉटेल वेलकम येथे लॉजवर रूम घेतली होती व या रूममध्ये एक महिला सोबत होती. या लॉकडाऊनच्या काळात सर्व हॉटेल बंद असताना हॉटेल वेलकम रिसॉर्टचे मॅनेजर रामहरी जानराव काळे (रा. सावळीविहिर खुर्द) याने हॉटेल चालू ठेवले होते.

याबाबत हॉटेलमधील रूममध्ये तोंडाला मास्क न बांधता तसेच प्रशासनाची परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र अगर पुरावे न घेता तसेच कुठल्याही प्रकारची नोंद न घेता हॉटेल मॅनेजरने आरोपीला रुम दिली. आरोपीच्या कृत्याने संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका आहे हे माहीत असताना त्यांनी तोंडाला मास्क न बांधता प्रवास केला म्हणून त्याने साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा कलम व जिल्हा दंडाधिकारी अहमदनगर यांनी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. याबाबत आरोपी मोसिन मेहमूद सैय्यद, हॉटेल मॅनेजर रामहारी जानराव काळे व 27 वर्षीय महिला यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 188(2), 269, 271 व साथरोग प्रतिबंध कायदा 1897 चे कलम 2, 3, 4 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 प्रमाणे वरील तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.

सध्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. सर्वजण आपापल्या घरात असताना शिर्डी व परिसरातील हॉटेल बंद असताना, लॉज बंद असताना तरीही अय्याशी करण्यासाठी काही जोडपे, शिर्डी व परिसरात येऊन लॉजवर रूम घेऊन राहतात. लॉजवाले अधिक पैशाच्या मोहापायी बिनधास्तपणे रूम देतात, कोणतेही ओळखपत्र किंवा नोंद ठेवली जात नाही, रजिस्टरही नसते, यामुळे करोनासारखा संसर्गाचा आजार मोठ्या प्रमाणात पसरू शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या