Monday, April 29, 2024
Homeनगरराहुरीत दारू वाहतूक करणारी वाहने पकडली

राहुरीत दारू वाहतूक करणारी वाहने पकडली

राहुरी (प्रतिनिधी)- सध्या लॉकडाऊनच्या काळात सरकारने दारूविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, राहुरी तालुक्यात दारूविक्रीला बंदी आहे. त्यामुळे अहमदनगर येथून अनेकजण दारू खरेदी करून वाहतूक करीत असताना पाच वाहने काल दि. 7 मे रोजी राहुरी पोलिसांनी नाकाबंदी करून पकडली. यावेळी मोठ्या प्रमाणात विदेशी दारू जप्त करण्यात आली.

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सरकारने दोन दिवसांपूर्वी दारू विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, प्रत्येक जिल्ह्याची व तालुक्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निर्णय घेण्याचे अधिकार सरकारने दिले आहेत. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांत दारूविक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

मात्र, राहुरी तालुक्यातील तहसीलदार फसिओद्दीन शेख यांनी दारू विक्रीला परवानगी दिली नाही. त्यामुळे तळीरामांना मोठे हाल सहन करावे लागत आहेत. तसेच दारूविक्री करणारे हॉटेल व्यावसायिक छुप्या मार्गाने दारूची तस्करी करीत आहेत. दि. 7 मे रोजी दुपारी चार वाजे दरम्यान राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर जिजाऊ चौक येथे राहुरी पोलिसांनी नाकाबंदी केली होती.

यादरम्यान चारचाकी वाहनातून दारूतस्करी करीत असताना हे वाहन पकडण्यात आले. तसेच एमएच 17 बीव्ही 1446, एमएच 17 बीव्ही 5943, एमएच 17 एझेड 9351, एमएच 17 एझेड 2242 तसेच एमएच 17 बीएक्स 2021 ही पाच वाहने ताब्यात घेतली आहेत. यावेळी हजारो रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठांचे आदेश व मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिवाजी खरात, सोमनाथ जायभाये, आजिनाथ पाखरे, अशोक कोळगे यांनी केली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या