राहाता तालुक्यात वादळी वा-यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

राहाता तालुक्यात वादळी वा-यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
कोऱ्हाळे (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे काल वादळी वा-यामुळे काही ठिकाणी कोऱ्हाळेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.  रात्री झालेल्या चक्री वादळाने झाडे पडली. भांबरे वस्ती येथे झाड कोसळून त्याखाली गायी दबल्याने एका गायीचा मॄत्यू झाला तर दोन गायी जखमी झाल्या. वादळामुळे राहता तालुक्यातील  कोऱ्हाळे येथील शेतकरी योहान तबाजी कोळगे येथे झाड कोसळल्याने झाडाखाली दबल्याने एक गायीचा मृत्यू तर दोन गाई जखमी झाले आहे.
अस्तगांव (वार्ताहर)- निसर्ग चक्री वादळाने अस्तगांव, पिंपळस परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. चक्री वादळासोबत पावसाने हजेरी लावली. त्यातच वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे परिसर अंधारमय झाला. रात्री दोन वाजेपर्यंत वादळ आणि त्या सोबत पावसाची रिपरीप सुरूच होती. या चक्री वादळाने अनेक ठिकाणी छोटे मोठे झाडे उन्मळून पडले. पिंपळस येथे भारत लोखंडे यांचे घरजवळील आंब्याचे झाड उन्मळून पडले. काही ठिकाणी शेतातील उभे पिकेही जमीनदोस्त झाली.
पावसाने दिलासा !
या मान्सून पूर्व पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पेरणीपूर्व मशागतीना यामुळे वेग येणार आहे. ज्यांनी नांगरणी केली, ते शेतात आता पाळी घातली तरी पेरणी करता येईल, असे शेतकरी सांगतात.
एकरूखे (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील गणेशनगर परिसरातील निसर्ग चक्री वादळ मध्ये काल बुधवार सायंकाळ पासून पहाटे 5 वा. पर्यंत मोठे सुसाट वारे चालू होते व रिमझीम पाऊस चालू होता त्यमुळे अनेक ठिकणि डाळिंबची फळे गळाले. गणेश परिसरातील रांजणगाव खु., एकरूखे , गणेशनगर, वाकडी, जळगाव, चितळी, रामपूरवाडी परिसरामध्ये डाळिंब चे क्षेत्र असल्यामुळे चक्री वादळ मुळे अनेक ठिकाणी डाळिंबचे फळे गळाले व मोठ्या प्रमाणात नुकसान झाली.
शिर्डी – विमानतळ रोडलगत विठ्ठलवाडी, गणेशवाडी येथील ग्रिन एन क्लिन शिर्डीच्या वतीने लावण्यात आलेली झाडे कोसळून पडली आहे.
Attachments area
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com