Friday, April 26, 2024
Homeनगरनगराध्यक्षा ममता पिपाडा व नगरसेवक राजेंद्र पिपाडा यांना पदावरून हटवा

नगराध्यक्षा ममता पिपाडा व नगरसेवक राजेंद्र पिपाडा यांना पदावरून हटवा

मुख्याधिकारी अशिमा मित्तलः नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना अहवाल

राहाता (तालुका प्रतिनिधी) – नगराध्यक्षा ममता पिपाडा कर्तव्य बजावण्यात हयगय व गैरवर्तन करत असून तसेच त्यांचे पती राजेंद्र पिपाडा नगरपरिषदेच्या दैनंदिन कामात हस्तक्षेप करतात. मुख्याधिकारी व सर्व विभाग प्रमुखांना दैनंदिन कामे करताना ती नगराध्यक्षांच्या मंजुरीशिवाय करू नये असे आदेश राजेंद्र पिपाडा देतात. सदर बाब अधिकाराचा गैरवापर करणारी आहे. त्यामुळे कायद्याचा भंग होत असून प्रशासकीय कामात गोंधळ व अडथळा निर्माण होत आहे. या कारणास्तव महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगीक नगरी अधिनियमन 1995 चे कलम 55 अ अन्वये नगराध्यक्षा व त्यांच्या पतीला पदावरून दूर करणेबाबतचा अहवाल राहाता पालिकेच्या प्रभारी आयएएस मुख्याधिकारी आशीमा मित्तल यांनी राज्याच्या प्रधान सचिव नगरविकास विभाग यांना पाठविला आहे.

- Advertisement -

महिनाभरापासून श्रीमती मित्तल यांच्याकडे राहाता पालिकेचा प्रभारी चार्ज असून त्यांनी या काळात राहाता पालिकेतील अनेक गैरव्यवहाराची तसेच अनागोंदी कारभाराची प्रकरणे बाहेर काढली असून दोन खातेप्रमुखांना त्यांनी निलंबीत केले. काहींना नोटिसा बजावल्या आहेत. नगराध्यक्षा ममता पिपाडा व त्यांचे पती राजेंद्र पिपाडा यांच्या विरोधात त्यांनी 21 डिसेंबर 2019 रोजी तसा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना दिला होता. त्याचबरोबर दि 23 ़डिसेंबर 2019 रोजी 99 पानांचा स्वतंत्र अहवाल साक्षी पुराव्यानीशी प्रधान सचिवांना देऊन नगराध्यक्षा ममता पिपाडा व त्यांचे पती राजेंद्र पिपाडा यांना पदावरून दूर करावे असा अहवाल दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या