Wednesday, April 24, 2024
Homeनगर40 क्वारंटाईन ठिकाणासह 2 हजार खाटा सज्ज !

40 क्वारंटाईन ठिकाणासह 2 हजार खाटा सज्ज !

– ज्ञानेश दुधाडे

कोरोनाशी लढण्यास प्रशासनाची जय्यत तयारी

- Advertisement -

अहमदनगर – जिल्ह्यात दिवसंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोना बाधीत आठपैकी एका रुग्णांवर कोरोनावर मात केली असली तरी कोरोना विषाणूचा धोका टळलेला नाही. यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अहोरात्र कष्ट घेत असतांना अनेक ठिकाणी नगरकरांची गर्दी कायम आहे. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाचा भडका उडाल्यास त्याच्याशी दोन हात करण्यासाठी आरोग्य विभागाने जय्यद तयारी केली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांना क्वारंटाईन करण्यासाठी 40 ठिकाणे तयार असून त्या ठिकाणी 2 हजारांहून अधिक खाटा (बेड) ची व्यवस्था करण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यात कोरोना बाधातांपैकी अधिक तर परदेशातून आलेले व्यक्त आहेत. स्थानिक संसर्ग झालेल्या बाधीतांची संख्या कमी असली तरी त्याचा धोका कायम आहे. यामुळे आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलीस रात्रंदिन प्रयत्न करतांना दिसत आहे. यासाठी शहरासह ग्रामीण भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागात देखील काटेकोरपणे ते पाळण्यात येत आहे. शहराशहराला जोडणारे रस्ते आणि गावागावाला जोडणारे रस्ते बंद करण्यात आले आहे. ग्रामीण भागात दंवडी आणि भोंग्यावर जमाव बंदी आणि संचार बंदीच्या सुचना देण्यात येत आहेत.

जिल्ह्यात 1 एप्रिलअखेर परेदशातून आलेल्या आणि कोरोनाची लक्षणे असणर्‍या 434 संशयतांची नमुने घेण्यात आले आहेत. यात आठ पॅझिटीव्ह आले असून 311 नमुने निगेटीव्ह आलेले आहेत. 122 व्यक्तींंचे अहवाल येणे बाकी आहे. सध्या जिल्ह्यात 455 व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात जिल्हा रुग्णालयात 124, जुन्या दीपक हॉस्पिटलमध्ये 9 आणि बुथ हॉस्पिटलमध्ये 7, प्रवरा आणि आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक एक व्यक्ती क्वारंटाईन असून 303 व्यक्तींना घरी सोडण्यात आलेले आहे. ग्रामीण भागात घरात क्वारंटाईन केलेल्याची संख्या 388 असून 139 व्यक्तींनी 14 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. कोरोनाशी लढा देण्यास आरोग्य विभाग सज्ज असून दररोज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी स्वत: फिरून पाहणी करत आहेत.

388 व्यक्ती होम क्वारंटाईन
जिल्ह्यात सध्या आरोग्याने 388 व्यक्तींना होम क्वारंटाईन केले आहे. या सर्वांवर पोलीस आणि आरोग्य विभागाची नजर आहे. या व्यक्तींना 14 दिवस घराच्या बाहेर पडण्यास बंदी असून हे व्यक्ती घरा बाहेर सापडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.

परजिल्ह्यातून आलेल्याची संख्या मोठी
कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर मुंबई, पुणे, यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातून अनेकांनी आपआपल्या गावी धाव घेतली आहे. प्रत्येक तालुक्यात यांची संख्या हजारोमध्ये आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने अशा सर्व व्यक्तींना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करत त्यांच्या हातावर शिक्के मारले आहे.

अशी आहे तयारी
आयसोलेशचे ठिकाणे 2 । क्वारंटाईनचे ठिकाणे 38 । आयोसोलेशन बेड 90 । क्वारंटाईनचे बेड 1 हजार 30 । नव्याने आयसोलेशन आणि क्वारंटाईनसाठी गरज भाजसल्यास नगर शहरातील रिकाम्या इमारती ताब्यात घेणार

- Advertisment -

ताज्या बातम्या