Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पुणतांब्यात उपसरपंच बदलाच्या हालचाली सुरू

Share
पुणतांब्यात उपसरपंच बदलाच्या हालचाली सुरू, Latest News Puntamba Upsarpanch Change puntamba

शिष्टमंडळ आ. विखे यांना भेटले

पुणतांबा (वार्ताहर)- आ. राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या राहाता तालुक्यात पुणतांबा-रास्तापूर ग्रामपंचायतीत विखे गटाच्या ग्रामपंचायत सदस्यामध्ये उपसरपंच बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात धुसफुस सुरु झाली असून विद्यमान उपसरपंचांना बदलण्यासाठी पुणतांब्याच्या शिष्टमंडळाने लोणी येथे आ. विखे यांची नुकतीच भेट घेतली.

मात्र आ. विखे यांना घाई असल्यामुळे त्यांनी 3 तारखेला चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळाला राहाता येथे बोलावले आहे. त्यामुळे शिष्टमंडळात गेलेल्या काही ग्रामपंचायत सदस्य तसेच उपसरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

पुणतांबा रास्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीचे पंचवार्षिक निवडणूकीसाठी मंगळवार 27 फेबुवारी 2018 मध्ये 17 जागांसाठी मतदान झाले होते. निवडणूक निकालात जनतेतून सरपंच डॉ धनवटे हे विजयी झाले होते तर 17 जागा पैकी 13 जागा विखे गटाला तर विरोधकांना 4 जागा मिळाल्या होत्या. 11 मे 2018 रोजी सरपंचपदाचा पदभार स्वीकारला होता. उपसरपंचपदी वंदना धनवटे यांची निवड करण्यात आली होती. उपसरपंचपदासाठी विखे गटाचे अनेक इच्छुक होते. मात्र सौ. धनवटे यांची निवड झाल्यामुळे अनेक नाराज झाले होते अनेकांनी उघडपणे नाराजी बोलून दाखविली होती.

अखेर वर्षानंतर इच्छुकांना संधी दिली जाईल, असा शब्द दिल्याचे इच्छुकांचे म्हणणे आहे. मात्र मे 2019 ला उपसरपंचपदात बदल न झाल्यामुळे इच्छुकांनी काही महिने झाल्यानंतर मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र त्यांना यश आले नाही. दोन दिवसापूर्वी अचानक या विषयाने उचल खाल्ली असून शिष्टमंडळाने थेट लोणी येथे जावून आ. विखे यांची गाठ घेतली. 11 मे 2020 रोजी उपसरपंचपदाला दोन वर्षे पूर्ण होतील.

त्याच्या अगोदर आ. विखे हे पद बदलण्याबाबत घाईघाई निर्णय घेणार का ? याकडे परिसराचे लक्ष लागून आहे. विखे पॅटर्नमध्ये पदे मागून मिळत नसतात सर्व बाबींचा विचार केल्यानंतर आ. विखे ठरवतील तिच पूर्वदिशा असते. असे असताना पुणतांबा ग्रामपंचायतीत उपसरपंचपदाच्या बदलाबाबत हालचाली सुरु करणेबाबदत कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!