Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

पुणतांब्यात कोरोना संशयित तरुणी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल

Share
पुणतांब्यात कोरोना संशयित तरुणी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल, Latest News Puntamba Corona Suspected Girl Admit Ahmednagar

पुणतांबा (वार्ताहर)- पनवेल येथून आलेल्या राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील कोरोनाचे संशयीत असलेली एक तरुणीस काल नगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

पुणतांबा येथील ही तरुणी पनवेल येथे कामास होती. ती काल रात्री एका टँकरने आली असल्याचे तिने सांगितले. मात्र कोणत्या टँकरने आली आणि कुठे उतरली याबाबत स्पष्ट सांगितले नसल्याने याबाबतची चर्चा सुरु होती. काल सकाळी तिला ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले असता तिच्या जिभेला, ओठाला आणि तोंडाला फोड आले असल्याचे दिसून आले.

त्यानुसार हे कोरोनाचे लक्षण असू शकते असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. व पुढील उपचारासाठी तिला नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी काल दुपारी तिला रवाना करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीनंतर तिचा अहवाल काय येतो या नंतरच तिला कोरोना आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. या भागात कोरोना संशयित रुग्ण आढळल्याने गावात व परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!