Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

व्हॅलेंटाईन विशेष : पुणे पोलीस म्हणताय, तिला प्रेमाने ‘नाही’ म्हणा? जाणून घ्या कारण

Share
व्हॅलेंटाईन विशेष : पुणे पोलीस म्हणताय, तिला प्रेमाने 'नाही' म्हणा? जाणून घ्या कारण Latest News Pune Valentines Day 2020 Pune Police Say Share Love No Password

नाशिक : मुंबई पोलिसांप्रमाणेच पिणे पोलिसही हटके करण्यात माहीर आहेत. आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्यांनी ट्विट करीत अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रेम शेअर करा, पासवर्ड नाही” असे पुणे पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला खास मॅसेज, शुभेच्छा, वस्तू भेट देऊन अथवा प्रेमाची भावना व्यक्त करुन अनेक लोक व्हॅलेंटाइन डे साजरा करतात. हेच निमित्त साधत पुणे पोलिसांनी खास ट्विट करत ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रेम शेअर करा, पासवर्ड नाही” अशा आशयाचे ट्विट केले आहे.

सध्या डिजिटल युगात वावरतांना आपली बरीच माहिती इंटरनेट आणि सोशल मीडियावर उपलब्ध असते. अशा वेळी आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने कितीही प्रेमाने आपला पासवर्ड कितीही प्रेमाने मागितला तरी, तो तुम्ही त्या व्यक्तीला देऊन नका. म्हणूनच “प्रेम शेअर करा, पासवर्ड नाही” असा खास पुणेरी शैलीत टोमणा मारत पुणे पोलिसांनी व्हॅलेंटाईन शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!