Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात अवकाळी पाऊस

पुण्यात अवकाळी पाऊस

सार्वमत

पुणे (प्रतिनिधि) — पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या अवकाळी पावसाने पुणे शहराला
झोडपले. सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस यामुळे शहरातील मंगळवार पेठ भागात इमारतीवरील मोबाईल टॉवर
कोसळला तर शिवाजीनगर येथील संचेती चुकतील भुयारी मार्गावरील दिशादर्शक लोखंडी कमान पडली. लॉकडाऊन
असल्याने तिथे वर्दळ नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, शहराच्या विवध भागात झाडे
पडल्याच्या ४० वर्दी मिळाल्याची माहिती पुणे अग्निशमन दलाने दिली.

- Advertisement -

मागील दोन दिवसांपासून पुण्यात वादळी वाऱ्यासह व ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस होत आहे.
शुक्रावरी झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडे, मोबाईल टॉवर कोसळण्याच्या घटना घडल्या. विश्रामबाग पोलीस
ठाण्याच्या तपास पथकाचे पोलीस शिपाई विठ्ठल खिलारे यांनी पोलिसांसाठी उभारलेल्या तंबूला दोन्हे हातांनी धरून
तंबूचे रक्षण केले. पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. कोरोनाची पुण्यात दहशत असताना आता रोज संध्याकाळी
अवकाळी पावसामुळे पुणेकरांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या