Thursday, April 25, 2024
Homeनगरपुणे स्टेशनहून लखनऊला धावली श्रमिक रेल्वे

पुणे स्टेशनहून लखनऊला धावली श्रमिक रेल्वे

पुणे (प्रतिनिधी) – कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजूर, विद्यार्थी व इतर नागरिकांसाठी महाविकास आघाडी सरकारचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने आज पुणे रेल्वे स्टेशनहून लखनऊ येथे श्रमिक रेल्वे रवाना करण्यात आली. सुमारे बाराशे प्रवाशांनी या रेल्वेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशला प्रयाण केले.

लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या परराज्यातील मजूर विद्यार्थी आणि नागरिकांसाठी श्रमिक रेल्वे या विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी परप्रांतीय मजुरांच्या रेल्वे तिकीटाचा सर्व खर्च उचलण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज्यमंत्री डॉ. कदम यांनी पुढाकार घेऊन परप्रांतीय नागरिकांसाठीच्या रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले. राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा मित्रपरिवार व कार्यकर्त्यांनी त्यासाठीचा समन्वय केला व आर्थिक बाजू सांभाळली. त्यामुळेच आज तिकीटासाठी एकही रुपया न देता या बाराशे मजुरांसाठी आपल्या या गावी परतण्याचा मार्ग खुला झाला. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशनहुन लखनऊला ही विशेष श्रमिक रेल्वे निघाली. आपल्या गावी परतणे शक्य झाल्याचा आनंद या प्रवाशांनी व्यक्त केला.

- Advertisement -

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीय मजूर, विद्यार्थी व नागरिकांसाठी निवारा केंद्रांची चोख व्यवस्था केली आहे. दोन वेळचा नाश्ता, भोजन यासह त्यांच्या आरोग्याचीदेखील देखभाल केली जात आहे. लाखो नागरिक त्याचा लाभ घेत आहेत. मात्र, तरीही कोणाला आपल्या गावी जायचे असल्यास त्यासाठीदेखील सर्वतोपरीने सहकार्य केले जात आहे. काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि गोरगरीब नागरिकांना कायमच मदत करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या धोरणांच्या जोरावर आपण कार्यरत आहोत.डॉ. विश्वजीत पतंगराव कदम (राज्यमंत्री महाविकास आघाडी सरकार, महाराष्ट्र राज्य)

- Advertisment -

ताज्या बातम्या