Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रकौतुकास्पद! बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट

कौतुकास्पद! बाळाला जन्म देण्याआधी तिने बनवला कोरोना तपासणी किट

मुंबई : भारतावरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. अशातच कोरोनावर लसही शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र ही सगळी आव्हाने पेलत एका माउलीने कोरोनाविरोधातली एक मोठी कामगिरी केली आहे. व्हायरोलॉजिस्टने असलेल्या या आईने कोरोना टेस्टिंग किटची कामगिरी पूर्ण केल्यानंतर एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून या आईचे कौतुक होत आहे.

डॉ. मिनल दाखवे भोसले असे या माउलीचे नाव असून पुणे येथील मायलॅबमध्ये संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख आहेत. अतिशय रेकॉर्ड ब्रेकिंग वेळेत म्हणजे चार महिन्याएवजी या महिलेने अवघ्या सहा आठवड्यात हे काम पुर्ण केले आहे. यावेळी ही महिला प्रसूतीच्या डेडलाईनसोबत लढा देत होती. डिलिव्हरीची तारीख जवळ आलेली असतानाही या महिलेने किट तयार करण्याच्या कामाला प्राधान्य दिले. किट तयार होताच काही तासांतच त्यांनी बाळाला जन्म दिला.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी करोनाचे टेस्टिंग किट बाजारात मिळू लागले आहे. त्यामुळे करोनाची चाचणी आणि स्क्रिनिंगचे प्रमाण वाढण्यासाठी मदत मिळणार आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्यांची सहज सोपी चाचणी करणे या किटमुळे शक्य होईल. पुण्यातील मायलॅबने देशात कर्मशीअल तत्वावर करोना किट तयार करण्यासाठीचा परवानगी मिळवली आहे.

देशाअंतर्गत किट तयार करणारी ही पहिली कंपनी आहे. मायलॅबने पहिल्या बॅचमध्ये एकुण १५० किट्स तयार करून पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा, बंगळुरू यासारख्या ठिकाणी लॅबमध्ये पाठवले आहेत. करोनाची चाचणी अवघ्या अडीच तासांमध्ये करणे या किटमुळे शक्य झाले आहे.

यावर प्रतिक्रिया त्या म्हणाल्या कि कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली होती, म्हणूनच मी हे आव्हान स्विकारले. मला माझ्या देशासाठी काही तरी भरीव योगदान द्यायचे होते. माझ्या दहा सहकाऱ्यांसह आम्ही खूप मेहनत घेत हा प्रकल्प यशस्वी केला याचा मला अभिमान आहे. त्यानंतर १८ मार्चला आम्ही टेस्टिंग किट जमा केले. त्यानंतर काही तासातस मी एका सुंदर मुलीला जन्म दिला असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या