Saturday, April 27, 2024
Homeनगरप्राथमिक शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकार्‍यांना विचारणार जाब

प्राथमिक शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकार्‍यांना विचारणार जाब

जिल्हा परिषदेच्या 879 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेला दांडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकत्याच झाल्याच्या पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 14 हजार 34 जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांपैकी 879 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. या विद्यार्थ्यांनी परीक्षेला ऐनवेळी दांडी का मारली याचा जाब जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांना विचार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या फंडातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील पाचवीचे पूर्व प्राथमिक तर आठवीचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थी बसवित आहेत. यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या फंडातून 7 ते 8 लाख रुपयांचा शुल्क परीक्षा यंत्रणेला भरण्यात येतो. झेडपीच्या शाळेतील गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्यात येत आहे. यासाठी वर्षभर विविध विशेष प्रशिक्षण आणि सराव परीक्षा घेण्यात येतात.

असे असतांना ऐनवेळी परीक्षेला संबंधीत विद्यार्थी का गैरहजर राहात असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्त वाढावी, खासगी शाळेच्या तुलनेत अधिक अधिक विद्यार्थींना शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग प्रयत्न करत असतांना ऐवढ्या मोठ्या संख्याने विद्यार्थी का गैरहजर राहातात याची कारणे शोधण्याचा प्रयत्न या निमित्ताने प्रयत्न करण्यात येणार आहे.

गेल्या रविवारी जिल्ह्यात शिष्यवृत्तीची परीक्षा पारपडली असून त्यात सर्वाधिक गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या ही नेवासा तालुक्यातीली आहे. या ठिकाणी 140 विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. अन्य तालुक्यात हा आकडा शंभरच्या आत आहे.

तालुनिकाहाय गैरहजर
नगर 81, संगमनेर 64, नेवासा 140, पाथर्डी 80, पारनेर 56, राहुरी 88, कर्जत 29, जामखेड 61, कोपरगाव 79, श्रीरामपूर 29, अकोले 39, श्रीगोंदा 34, शेवगाव 26, राहाता 73 एकूण 879 असे आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिष्यवृत्ती परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. असे असताना नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला 879 विद्यार्थी का गैरहजर होते, याबाबत गटशिक्षणार्‍याकडे विचारणा करण्यात येईल.
– रमाकांत काटमोरे, शिक्षणाधिकारी, जि. प.

- Advertisment -

ताज्या बातम्या