Type to search

Featured नाशिक

महागाईची झळ सोसवेना..

Share

नाशिक | जयश्री भामरे

नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत आणि येत्या दिवाळीच्या पाश्वभूमीवर खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत .दिवाळी ऐन उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.सध्या नवरात्रांच्या उपवासामुळे घरोघरी खमंग भाजणीचा वास दरवळतोय तर दिवाळीचा फराळ तयार करण्याची लगबग ही सुरू झाली आहे.मात्र साखर, गूळ, शेंगदाणे ,डाळ यांचे दर वाढल्याने या दिवाळीत मात्र सर्वसामान्याचं दिवाळ निघणार आहे .
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या किंमतीत चढउतार होतात हे काही नवीन नाही परंतु आज ठिकठिकाणी नवरात्रात मोठ्या जल्लोषात साजरी होतं आहे.

दसरा आणि दिवाळी यांमध्ये काही दिवसांचेच अंतर असल्याने फराळ व घरात रोज लागणाऱ्या किराणा वस्तूंची खरेदी सुरू आहे.मात्र या वस्तूंच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे.गेल्या महिन्यात ३० रुपये किलोने विक्री होणाऱ्या साखरेचा दर ३९ रुपये झाला आहे.गूळ ही पाच रुपयांनी महागला असून तो ६० रुपये प्रति किलोने विकला जात आहे.

प्रामुख्याने उपवासाच्या प्रत्येक पदार्थात वापरले जाणारे शेंगदाणे ही आता भाव खाऊ लागले आहेत.शेंगदाण्याचे किलोचे दर १३५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत .गेल्या महिन्याच्या सुरवातीला शेंगदाणा १२० ते १२५ रुपये किलोने विक्री होत आहे .दिवाळीच्या सुरवातीस ते आणखी वाढण्याची शक्यता आहे .तूर ,मठ ,मसूर व चना डाळ यांचे दरही शंभर रुपयांकडे आगेकूच करीत आहेत.आणि दिवाळीच्या प्रत्येक फराळात डाळींचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो .त्यामुळे सणासुदीच्या काळात ही महागाई ची झळ सर्वसामान्याना भेडसावते आहे.

किराणा मालाचे दर (प्रति किलो )
साखर- 39
गूळ- 60
मठडाळ – 90
तुरडाळ- 90
चना डाळ- 70
मसूर डाळ – 70
शेंगदाणा – 135 ते 140

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!