Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशराष्ट्रपती घेणार ३० टक्के कमी पगार

राष्ट्रपती घेणार ३० टक्के कमी पगार

नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ३० टक्के कमी पगार घेणार आहेत. सोबतच, करोनाविरोधी लढ्यात सरकारला मदत म्हणून त्यांनी खच कपातीचेही काही उपाय योजले आहेत. भौतिक दूरता नियमाचे काटेकोर पालन करण्याकरिता राष्ट्रपतींनी आपले देशांतर्गत सर्व दौरे आणि कार्यक्रम कमी केले आहेत. याशिवाय, अनावश्यक खर्च होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

सध्या राष्ट्रपती भवनात भेटीला येणार्‍या पाहुण्यांची संख्याही कमी झाली असल्याने, त्यांच्यासाठी आयोजित होणार्‍या स्वागत कार्यक्रमांचे स्वरूपही लहान करण्यात आले आहे. याशिवाय, त्यांच्या मेजवान्यांवर होणारा खर्चही कमी केला जाणार असल्याचे राष्ट्रपती भवनातर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. राष्ट्रपती भवनात विविध कार्यक्रमांवर होणार्‍या खर्चात कपात करून, त्यातून उरणारा पैसा सरकारला करोनाविरोधी लढ्यासाठी देण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या