Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

प्रवरा नदीवरील सर्व बंधारे भरून द्यावेत

Share
प्रवरा नदीवरील सर्व बंधारे भरून द्यावेत, Latest News Pravara River Bandhara Water Demand Shrirampur

कालवा सल्लागार समितीने निर्णय घेण्याची शेतकर्‍यांची मागणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील उन्हाळी हंगामाच्या सिंचनाच्या निळवंडे धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे या आवर्तनातूनच प्रवरा नदीपात्रावरील 14 बंधारे भरून देण्याची मागणी नदी काठावरील शेतकर्‍यांनी केली आहे.

सध्या प्रवरा नदीपात्रावरील कोल्हापूर पध्दतीच्या बहुतांशी बंधार्‍यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सध्या जरी पाणी पातळी बर्‍यापैकी असली तरी काही दिवसाताच पाणी पातळी खालावून पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यामुळे प्रवरा नदीपात्रातील सर्व 14 बंधार्‍यात पाणी सोडून ते भरल्यास पाणी टंचाई जाणवणार नाही व शेतीचा प्रश्नही सुटेल. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या आवर्तनातनाला जोडून आवर्तन घेवून या बंधार्‍यात पाणी सोडून हे बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन मिळावेत, अशी मागणी प्रवरा काठावरील शेतकर्‍यांमधून होत आहे.

शनिवारी शेतीसाठी आवर्तन सोडले त्यावेळी भंडारदरा व निळवंडे धरणात सुमारे 15 ते 16 टीएमसी पाणीसाठा होता. या शेती सिंचनाच्या आवर्तनासाठी तीन ते साडेतीन टीएमसी पाणीसाठा जाणार आहे. तर त्यानंतर पुन्हा पिण्यासाठी दोन आवर्तने सोडल्यानंतर त्यामध्ये अंदाजे दोन टीएमसी पाणी जाणार आहे. तरी देखील निळवंडे व भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक राहणार आहे.

तर एप्रिल-मे महिन्यातही आवर्तनही होऊनही पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या आवर्तनाला जोडूनच आवर्तन घेऊन प्रवरा नदीपात्रावरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे भरून मिळावेत, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

दरम्यान, मागील वर्षी श्रीरामपूर तालुक्यासह प्रवरा नदीकाठावरील बागायती पट्टाही दुष्काळात होरपळला. पाण्याअभावी ऊस पिकांचेही क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. पाण्याअभावी उभी पिके जळून गेल्याने शेतकरी अडचणीत आले तर अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले. मात्र चालू वर्षी पर्जन्यमान समाधानकारक झाल्याने पाणी पातळी वाढली.

त्यामुळे रब्बीतील गहू, कांदा, हरभरा, ऊस या पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मार्च महिना सुरु झाल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. अनेक भागात पाणी पातळी खालावली आहे. तर प्रवरा नदीवरील बंधार्‍यांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात पाणी टंचाईची झळ बसण्याअगोदरच प्रवरा नदीवरील बंधार्‍यात पाणी सोडून बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

कालवा सल्लागार समितीचे दुर्लक्ष
भंडारदरा व निळवंडे धरणातून शेतीसाठी शनिवारी सकाळी शेतीसाठी आवर्तन सोडले. त्यावेळी या दोन्ही धरणातील एकूण पाणी सुमारे 16 टीएमसी ूहोते. भंडारदरा व निळवंडे धरणांतील मुबलक पाणीसाठा लक्षात घेऊन प्रवरा पात्रातील बंधारे (केटीवेअर) भरणे शक्य आहे, मात्र या पाण्याचे नियोजन करताना कालवा सल्लागार समितीने या बंधार्‍यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जून महिन्यात शिल्लक पाणी नदीपात्रात सोडण्याची वेळ येणार आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!