Friday, April 26, 2024
Homeनगर1 लाखाहून अधिक किंमतीच्या 100 पीपी किट प्रदान

1 लाखाहून अधिक किंमतीच्या 100 पीपी किट प्रदान

शिलधी प्रतिष्ठान अनोखा उपक्रम; साई संस्थान रुग्णालय, पोलीस, नगर पंचायत कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- कोरोनाच्या पाश्वभूमीवर शिर्डी येथील शिलधी प्रतिष्ठानने साईसंस्थानचे रुग्णालयातील कर्मचार्‍यांसाठी तसेच पोलीस बांधव आणि नगरपंचायतचे कर्मचार्‍यांसाठी मोठ्या प्रयत्नाने 1 लाखाहून अधिक किमतीच्या 100 पीपी किट उपलब्ध करून दिल्या आहेत. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते यांच्या हस्ते या पीपी किट सुपूर्द करण्यात आल्या.

- Advertisement -

शिर्डी येथील शिलधी प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शहरात विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असतात, कोरोना रोगाच्या पाश्वभूमीवर शिलधी प्रतिष्ठानने यंदाचा गुडीपाडवा महोत्सव रद्द केला असून वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे शिर्डी शहरात साईसंस्थान, शिर्डी पोलीस स्टेशन व नगर पंचायतीच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या कामात आपणही खारीचा वाटा उचलावा या उदात्त हेतूने शिलधीच्या साईबाबा संस्थानच्या विविध विभागात काम करत असलेल्या सदस्यांनी एकत्र येत आपला एक दिवसाचा पगार अथवा ऐच्छिक रक्कम गोळा केली.

साई संस्थानच्या माध्यमातून शहरात गरजूंसाठी अन्नदान व इतर आवश्यक उपाययोजना सुरू होत्या मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना पीपी किटची अत्यंत आवश्यकता व मागणी असतांना त्यांचा तुटवडा असल्याने उपलब्ध होत नव्हत्या. अशावेळी शिलधी प्रतिष्ठानने मोठ्या प्रयत्नाने 1 लाखाहून अधिक किमतीच्या 100 किट उपलब्ध करून साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोपविण्यात आल्या.

याप्रसंगी उपकार्यकरी अधिकारी रविंद ठाकरेे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, रुग्णालयाचे अधिकारी डॉ. विजय नरोडे, डॉ. मैथिली पितांबरे, डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. अविनाश जाधव, डॉ. दिपक कांदळकर, खरेदी अधिकारी कुणाल आभाळे, अधिसेविका थोरात यांच्याकडे देणगी स्वरूपात सुपूर्द केल्या.
याबरोबरच पोलीस स्टेशन, नगरपंचायत कर्मचार्‍यांबरोबरच पत्रकार बंधूंनाही कोरोनॉच्या पाश्वभूमीवर मास्क, ग्लोस्, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले.

कोरोनोच्या उपाययोजना कामी शिलधी प्रतिष्ठानने आवश्यक साहित्याच्या वाटपाबरोबर साई संस्थानच्या रक्त पेढीच्या माध्यमातून राबविण्यात येणार कॅम्प बंद असल्याने रक्त पेढीच्या आवश्यकतेनुसार शिलधीचे सदस्य स्वतः रक्तदान करून परिसरातील युवकांना रक्तदानाचे आवाहन करणार आहे. या वेळी शिलधीचे संस्थापक माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते व अध्यक्ष तुषार शेळके यांनी कोरोनो प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध ठिकाणच्या डॉक्टर, रुग्णालयातील सर्व टीम, पोलीस यंत्रणा, शासकीय यंत्रणा, आरोग्य (स्वछता) कर्मचारी विविध दाते आणि सामाजिक संघटनाबरोबर पत्रकार बांधवांनी कोरोनो संकटावर मात करण्यासाठी जो लढा उभा केला आहे त्याबद्दल शिलधीच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली. शिलधी प्रतिष्ठानचे आधारस्तंभ माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.

रामनवमी उत्सवाच्या पाश्वभूमीवर संस्थानला आजवर विविध प्रकारच्या देणग्या उपलब्ध होत असे, मंदिर भक्तांसाठी बंद असतानाही संस्थानला आवश्यक किट उपलब्ध झाल्याने रुग्णालय कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याकामी शिलधी प्रतिष्ठानचे सचिव साईप्रसाद जोरी, प्रमोद पवार, शेखर सालकर, बाळासाहेब महाडिक, मूकुंद डहाळे, निलेश शेळके, योगेश गोरक्ष, जितू गाढवे, संतोष ढेमरे, सुदेश शिंदे, महेश पवार, भैया शिंदे, चंदू साळुंके, विकास शिंदे, गणेश लोखंडे, दिनेश कानडे, संदेश खोत, उपेंद्र पाठक, प्रसाद चव्हाण, सचिन क्षीरसागर, गणेश पाठक, संभाजी तुरकणे, प्रसाद खांडरे, उल्हास गलांडे, अतुल वाघ, जगू भोसले, विश्वनाथ, विक्रम एंडाईत, रवि नेवासकर आदींचे सहकार्य लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या