Type to search

Featured

नाशिक पूर्वमध्ये सानप, ढिकले सरळ लढत; दोघांची माघार 12 उमेदवार रिंगणात

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंंघात आज अर्ज माघारीच्या दिवशी मनसेनेचे अशोक मुर्तडक यांनी माघार घेतल्याने आता राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान आमदार बाळासाहेब सानप व भाजपचे राहुल ढिकले यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात 14 उमेदवारांनी अर्ज भरले होते. पैकी 2 उमेदवारांनी माघार घेतल्याने 12 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात भाजपने आमदार बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापल्याने शेवटच्या क्षणापयर्ंत राजी-नाराजी नाट्य रंगले. अखेरच्या क्षणी सानप यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेत भाजपला झटका दिला आहे.

नाशिक पूर्व मतदारसंघातून राहुल ढिकले यांना मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी निश्चित झाली होती. मात्र; त्यांनी सत्ताधारी भाजपचा हात धरल्याने पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवारच नसल्याची स्थिती निर्माण झाली होती. ऐनवेळी मनसेनेकडून माजी महापौर अशोक मुर्तडक यांना तर कॉँग्रेसकडून कवाडे गटाचे गणेश उन्हवणे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते.

परंतु अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सानप यांनी राष्ट्रवादी पक्षातर्फे तर बहुजन समाजवादी पक्षाकडून अ‍ॅड. अमोल पहाडे यांनी अर्ज भरला. आज उमेदवारी अर्ज माघारी च्या दिवशी केवळ अशोक मुर्तडक व शशीकांत उन्हवणे यांनी अर्ज माघारी घेतले. यामुळे निवडणुकी रिंगणात अद्याप 12 उमेदवार आहेत. असे असले तरी इतर उमेदवार तितक्या ताकदीचे नसल्याने खरी तुल्यबळ लढत ही राष्ट्रवादी, काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार बाळासाहेब सानप व भाजप, सेना महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले यांच्यात होणार असल्याचे सष्ट चित्र आहे.

सानपांना बळ?
मनसेनेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी पक्षाध्यक्षांच्या आदेशानुसार अर्ज माघारी घेत असल्याचे सांगितले असले तरी यातून मनसेना राष्ट्रवादीला सहकार्य करत असल्याचे लपून राहिलेले नाही. यासह मुर्तडक व सानप यांच्यात वंजारी समाजाची मतविभागणी याद्वारे टाळण्यात आली आहे. तसेच काँग्रेसचे गणेश उन्हवणे यांचा अर्ज असला तरी कॉग्रेसही सानप यांना पाठिंबा घोषित करणार असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल आहेर यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व घडामोडी तसेच हक्क असतानाही डावलले गेल्याची भावना याची मोठी सहानभूती मिळून सानपांना अधिक बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

पूर्वचे उर्वरित उमेदवार असे 
बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी, आघाडी), राहुल ढिकले (भाजप, महायुती), गणेश उन्हवणे (कॉग्रेस), अ‍ॅड. अमोल पहाडे (बहुजन समाजवादी पक्ष), अपक्ष: संतोष नाथ, महेश आव्हाड, नितीन उन्हवणे, भारती मोगल, शरद बोडके, सुभाष पाटील, संजय बुरकुले, महादेव सांगळे.
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!