Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

मध्यप्रदेशात राजकीय धुळवड; ज्योतिरादित्य सिंधिया यांचा भाजपात प्रवेश

Share

मुंबई : कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज दिल्लीमध्ये भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून कॉंग्रेस पक्षावर, कमलनाथ यांच्या सरकारवर नाराज असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस पक्षाची साथ सोडली.

दरम्यान कॉंग्रेस पक्षाच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ पसरली होती. मात्र आज अखेर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून सार्‍या चर्चांना पूर्णविराम लावले आहे.

दि. १० मार्च रोजी सकाळी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भेटीनंतर सिंधिया भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. आता संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर मोदी सरकारमध्ये ज्योतिरादित्य यांचा समावेश होऊ शकतो. तसेच त्यांना राज्यसभेवर घेतले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे.

सिंधिया यांनी आपण कॉंग्रेस पक्षामध्ये राहून देशाची सेवा करू शकत नाही असं एका ट्विटमधून म्हटलं होतं. सिंधिया यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सोडचिट्ठीची घोषणा केल्यानंतर तो कॉंग्रेसकडून तात्काळ मंजुरदेखील करण्यात आला.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसला मध्य प्रदेशात सरकार गमवण्याचीदेखील नामुष्की आली आहे. सिंधिया यांच्यासोबत सुमारे २२ समर्थकांनी राजीनामा धाडल्याने कमलनाथ सरकार अल्पमतामध्ये आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!