Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

224 समाजकंटकांना मनाई हुकुम; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून दक्षता

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बाधा पोहचू शकतील, अशा 224े समाजकंठकांना मनाई हुकूम बजावण्यात आला आहे. त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवून हा आदेश पारित करण्यात आला असून, नियमाचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पंचवटी पोलिस ठाणे हद्दीतील 25, आडगावमधील 14, म्हसरूळ हद्दीतील 32, भद्रकालीतील 46, मुंबईनाका 31, गंगापूर हद्दीतील सर्वाधिक म्हणजे 48 तर सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतील 28 अशा 224 जणांना मनाई हुकूम नोटीस बजावण्यात आली आहे. मनाई आदेश पारित करण्यात आलेल्या व्यक्तींविरूद्ध शरीराविरूद्ध, मालाविरूद्ध तसेच दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल आहे. या व्यक्ती मतदानाच्या तसेच मतमोजणीच्या दिवशी सार्वजनिक शांतता भंग करण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर 19 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 5 वाजेपासून 21 ऑक्टोबरपर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत आणि 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत मनाई नोटीस मिळालेल्या समाजकंटकांना शहर हद्दीत राहण्यास मनाई करण्यात आली आहे. या सराईतांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंतची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर संशयितांना पुन्हा शहराबाहेर पडावे लागणार असून, या नियमाचे उल्लंघन करणार्‍यांवर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!