पोलीस पाटील रिक्त पदांचे आरक्षण; लोकसंख्या टक्केवारी निश्चित

नेवासा तालुक्यातील 26 गावांनी घेतल्या विशेष ग्रामसभा

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील पोलीस पाटील रिक्त पदाचे आरक्षण, लोकसंख्या टक्केवारी निश्चितीसाठी नेवासा तालुक्यातील 26 गावांनी विशेष ग्रामसभा घेऊन जात-प्रवर्ग निहाय लोकसंख्येची टक्केवारी निश्चितिचे ठराव केले आहेत.

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, दिघी, खुपटी, खेडले परमानंद, रामडोह, म्हाळसपिंपळगाव, खेडले काजळी, गोंडेगाव, महालक्ष्मी हिवरे, देवगाव, अंतरवली, म्हसले, वाटापूर,पाथरवाला, मुरमे, निपाणी निमगाव,घोगरगाव,गोपाळवाडी, पाचुंदे, सुरेगाव-दहीगाव, जैनपूर, खलाल पिंप्री, झापवाडी, नजीक चिंचोली व हंडीनिमगाव या 26 गावांचे पोलीस पाटील पद रिक्त आहेत.

पोलीस पाटील पद भरती प्रक्रिया सन 2019-20 साठी पोलीस पाटील रिक्त पद भरतीचे आरक्षण निश्चित करण्यासाठी गावातील लोकसंख्येची टक्केवारी निश्चितीसाठी नेवासा तहसीलदारांनी दि.13 मार्च रोजी संबंधित गावांची विशेष ग्रामसभा घेऊन विहित नमुन्यातील ठराव तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहीने सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या वरील 26 गावांनी विशेष ग्रामसभा घेतल्या आहेत.

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्राम विकास अधिकारी रेवन्नाथ भिसे यांनी पोलीस पाटील रिक्त पद आरक्षणासाठी लोकसंख्येनुसार निश्चित कराव्याचया टक्केवारी बाबदच्या मार्गदर्शक सूचना ग्रामसभेत वाचून दाखविल्या.तलाठी विजय जाधव यांनी भेंडा बुद्रुक एकूण गावाची लोकसंख्या व जाती-प्रवर्गनिहाय लोकसंख्येची टक्केावारी ग्रामसभेत वाचून दाखविली,त्यास ग्रामसभेने मान्यता दिली.

जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,माजी सरपंच अशोकराव मिसाळ, गणेश गव्हाणे, अंबादास गोंडे, माजी पोलीस पाटील बलभीम गव्हाणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बलभीम फुलारी, माजी उपसरपंच अशोक वायकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक काळे,देवेंद्र काळे,रोहिदास आढागळे, नामदेव निकम, अ‍ॅड.रवींद्र गव्हाणे, भेंडा सोसायटीचे अध्यक्ष किसन यादव, रामचंद्र गंगावणे, कादर सय्यद आदीसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

नजीक चिंचोली ग्रामपंचायत कार्यालयात शिवाजीराव पाठक, तलाठी नाचण, ग्रामसेविका उत्कर्षा देवतरसे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा झाली. त्यात पोलीस पाटील रिक्त पद आरक्षण जात-प्रवर्ग लोकसंख्येनुसार टक्केवारी निश्चित करण्यात आली.

गोंडेगाव-म्हसले ग्रुप ग्रामपंचायतीच्या गोंडेगाव येथील कार्यालयात सरपंच गवाजी आढागळे, तलाठी विजय जाधव, व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा झाली. त्यात पोलीस पाटील रिक्त पद आरक्षण जात-प्रवर्ग लोकसंख्येनुसार टक्केवारी निश्चित करण्यात आली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *