Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर : तिघा दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल

Share
पोलीस आता परदेशी बाबुंच्या शोधात, Latest News Police Search Foreign People Ahmednagar

संगमनेर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने राबविलेल्या बंदफच्या मोहिमेनंतर शहरातील 3 दुकानदारांनी आपली दुकाने सुरु ठेवल्यामुळे शहर पोलिसांनी संबंधीत व्यावसायिकांविरोधात जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.

संपत दत्तात्रय सुर्यवंशी (वय 45, रा. अकोले बायपास रोड, संगमनेर) यांनी अकोले बायपास येथील संतोष बॉडी बिल्डर दुकान सुरु ठेवले होते, तर रोहिदास प्रकाश ढोले (रा. कासारादुमाला), तसेच अकोले नाका येथे विलास नामदेव गायकवाड याने पानाचे दुकान चालु ठेवले होते. या तिघांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आदेशाचे उल्लंघन करुन दुकान चालू ठेवून मालाची विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!