Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीगोंदा : राजस्थानला निघालेले तीन दुचाकीवरील सहाजण ताब्यात

श्रीगोंदा : राजस्थानला निघालेले तीन दुचाकीवरील सहाजण ताब्यात

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- दुचाकीवर राजस्थानला निघालेल्या सहा जणांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांची नजर चुकवून ते मोटारसायकलवर राजस्थानला जात असताना नाक्यावर पोलिसांनी पकडले असून त्यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लांगाराम कुमावत, जठराम कुमावत, धनुराम कुमावत, अंबाराम कुमावत, कमलाराम कुमावत, हेमराज कुमावत हे सहा जण तीन दुचाकी घेऊन बाडमेर (राजस्थान) येथे निघाले होते. ते श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत आल्यानंतर पोलिसांनी लोणी व्यंकनाथ शिवारात चेकपोस्टवर त्यांना ताब्यात घेतले. अशा प्रकारे अनेकजण प्रवास करत आहेत. मोटारसायकलवर राजस्थान गाठण्याचा त्यांचा मानस होता.

- Advertisement -

मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. साथ रोग प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पुण्यावरून कुळधरणकडे जाणार्‍या एका शेतीमालाची वाहतूक करणार्‍या गाडीत (एम.एच.-16, सीसी 5748) अशोक बाळासाहेब शिंदे, सोमनाथ अशोक देशमुख, शुभांगी सोमनाथ देशमुख (रा.कोपर्डी, ता.कर्जत), पोपट बंकट सुपेकर, उत्तम दत्तात्रय कळसकर, दीपक बंकट सुपेकर (रा. कुळधरण, ता.कर्जत) हे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आढळून आले. पोलिसांनी निमगाव खलुमध्ये पिकअप अडविले. त्यात या व्यक्ती आढळून आल्या. या बाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल अमोल आजबे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या