Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

पीएमसी बँक घोटाळ्याचं दाऊद कनेक्शन

Share

मुंबई:

पीएमसी बँक घोटाळ्याचे आता दाऊद कनेक्शन समोर आले आहे. एचडीआयएलची सिस्टर कंपनी असलेल्या दीवाण हाऊसिंग अँँण्ड फायनान्स लिमिटेड, अर्थात डीएचएफएल कंपनीसोबत दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्ची याचे संबंध उघड झाले आहेत. मिर्ची विरोधात अफरातफरीच्या 8 प्रकरणांची चौकशी करताना ईडीने मुंबई आणि बंगळुरूमध्ये छापे टाकले होते.

या मध्ये काही ईमेल तपास यंत्रणेच्या हाती लागले असून त्यात मिर्चीचे डीएचएफएलसोबत संबंध उघड झाले आहेत. एचडीआयएल आणि डीएचएफएल या कंपन्या काही वर्षांपूर्वी एकच होत्या. एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान याचा पुतण्या कपिल वाधवान आणि धीरज बाबा दीवाण यांनी डीएचएफएल कंपनी स्थापन केली होती. हे आरोप दुर्दैवी असून स्वतःला सिद्ध करण्यासाठी तपास यंत्रणांना या पुढेही पूर्ण सहाकार्य करण्यात येईल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!