Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशसीएएबद्दल अफवा पसरवून तरुणांची दिशाभूल – नरेंद्र मोदी

सीएएबद्दल अफवा पसरवून तरुणांची दिशाभूल – नरेंद्र मोदी

कोलकाता – नागरिकत्व कायद्याबद्दल अफवा पसरवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे, हा कायदा नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरू आहे. त्याचवेळी नरेंद्र मोदी यांनी कोलकातातील बेलूर मठ येथे या कायद्याबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. तसंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षांवर निशाणा साधला. हा कायदा नागरिकत्व देणारा आहे, हिसकावून घेणारा नाही.

- Advertisement -

हा कायदा एका रात्रीत नव्हे, तर विचारपूर्वक तयार केला आहे. मात्र, काही राजकीय पक्ष जाणूनबुजून समजावून घेत नाही. हा कायदा लागू झाल्यानंतर अल्पसंख्याकांवर अत्याचार का केले, याचं उत्तर पाकिस्तानला द्यावं लागेल, असं मोदी म्हणाले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तरुणांच्या मनात या कायद्याबाबत शंका निर्माण केल्या आहेत. अनेक तरुण या अफवांचे बळी ठरले आहेत. त्या तरूणांना समजावून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे, दुसर्‍या देशातला कुणीही नागरिकत्व घेऊ शकतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे.

फाळणीमुळं ज्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले, त्यांना भारतीय नागरिकत्व द्यायला पाहिजे असं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासहित अनेक दिग्गज नेत्यांना वाटत होतं, जे गांधीजींनी सांगितलं त्याचं पालन आम्ही केलं. आजही कोणत्याही धर्माची व्यक्ती ज्यांचा भारताच्या संविधानावर विश्वास आहे, ते प्रक्रियेनुसार भारतीय नागरिकत्व मिळवू शकते, असेही मोदी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या