Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

महाविद्यालयांना ‘शारीरिक शिक्षण’ विषय अनिवार्य

Share

सन 2015 पासून विषय सुरू मार्गदर्शिका पाठविली संलग्न महाविद्यालयांकडे उपलब्ध सुविधांवर राबवावा लाग़णार अभ्यासक्रम

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत शिकणार्‍या सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2015 पासून पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी शारीरिक शिक्षण हा विषय सुरू करण्यात आला आहे. त्याबाबतची मार्गदर्शिका तयार करून यापूर्वीच सर्व संलग्न कॉलेजांमध्ये पाठवण्यात आली आहे. त्यातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कॉलेजांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधांच्या आधारे हा अभ्यासक्रम राबविणे अपेक्षित आहे, अशी विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

यूजीसीच्या सूचनांनुसार, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा विषय ‘क्रेडिट सिस्टिम’द्वारे शिकवण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामागे विद्यार्थ्यांचे आरोग्यसंवर्धन व्हावे, हा मूळ हेतू आहे. हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व संलग्न कॉलेजांमध्ये लागू करण्यापूर्वी विद्यापीठाच्या संबंधित अभ्यास मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

शारीरिक शिक्षण संचालकांचे शिबिर दरवर्षी आयोजित केले जाते. या वर्षीसुद्धा ते जुलै महिन्यात घेण्यात आले. त्याला सर्व कॉलेजांच्या शारीरिक शिक्षण संचालकांनी उपस्थित राहणे अपेक्षित असते. त्यात या अभ्यासक्रमाबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्यामुळे ही माहिती सर्व कॉलेजांपर्यंत पोहोचविण्यात आली होती. त्यानुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नाशिक, पुणे व नगर जिल्ह्यांमधील बहुतांश कॉलेजांमध्ये हा अभ्यासक्रम राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्राध्यापक अनभिज्ञ
शारीरिक शिक्षणाचा बदललेला अभ्यासक्रम, क्रेडिट सिस्टिम अशा कोणत्याही गोष्टींची माहिती अजूनही विद्यापीठ प्रशासनाने शारीरिक शिक्षणाच्या प्राध्यापकांना दिले नसल्याचे समोर आले आहे. सध्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नाशिक, पुणे व नगर या जिल्ह्यातील कॉलेजांमधील एकाही प्राध्यापकाने हा विषय क्रेडिट सिस्टिमद्वारे शिकविला नाही. यासोबत या विषयाचा अभ्यासक्रमदेखील वगळण्यात आला आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात कोणत्या मुद्यांवर भर देण्यात आला आहे, अशा विविध बाबींमुळे प्राध्यापकही अनभिज्ञ आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!