Thursday, April 25, 2024
Homeनगरसकाळी पाच ते सांयकाळी पाच मिळणार डिझेल

सकाळी पाच ते सांयकाळी पाच मिळणार डिझेल

जिल्हाधिकारी : कंपन्यांमधील कर्मचार्‍यांसाठी बससेवा उपलब्ध करण्याचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील कॅन्टोंमेन्ट (हॉस्पॉट) झोन वगळता सार्वजनिक सोयीसुविधांच्या अनुषंगाने पेट्रोल पंपावरील डिझेल विक्रीची वेळ वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. यात जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये डिझेल विक्रीची वेळ आता सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. तर पेट्रोल विक्री पूर्वीप्रमाणेच दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंतच ठेवण्यात आलेली आहे.

- Advertisement -

दरम्यान, उद्योग-औद्योगीक आस्थापना (सरकारी व खाजगी दोन्ही) कार्यान्वित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आदेश जारी केले होते. त्या आदेशात सुधारणा करण्यात आली असून उद्योग आणि औद्योगिक आस्थापना यांनी त्यांच्या आस्थापनावरील व्यक्तींना निवास व अनुषांगिक बाबींची व्यवस्था त्यांच्या कंपनीच्या आवारातच करावी, ही अट रद्द करण्यात आली आहे.

या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. हे करताना सोशल डिस्टन्सिंग तत्वाचे काटेकोर पालन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.

पूर्वीच्या आदेशात उद्योग-औद्योगीक आस्थापना संकेतस्थळावर माहिती भरून उद्योग सुरू करणेबाबत परवानगी घ्यावी. तसेच उर्वरीत उद्योग-औद्योगिक आस्थापना यांनी नमूद केल्याप्रमाणे व्यक्तींना एकदाच कामाच्या ठिकाणी हजर होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी प्राप्त करून घ्यावी, असे म्हटले होते. आता त्याऐवजी संकेतस्थळावर माहिती भरून उद्योग व्यवसाय सुरु करण्याबाबत परवानगी घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

उद्योग- औद्योगीक आस्थापनांवरील व्यक्तींना कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी वैयक्तीक पासेस दिले जाणार नाहीत. या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी आणि त्या बसेसकरिता संकेतस्थळावर माहिती भरून पासेस प्राप्त करून घ्यावे. बसेस वापरण्यापूर्वी पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून घ्याव्यात. बसेसमध्ये सॅनिटायझर्स ठेवण्यात यावे. बसमध्ये चढताना व उतरताना सॅनिटायझर्स वापरून हात धुणे बंधनकारक राहील. हे करताना डेलळरश्र ऊळीींरपलळपस तत्वाचे काटेकोर पालन करावे असे बदल करण्यात आलेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या