Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जनता कर्फ्यूला सहकार्य करा – इंदोरीकर महाराज

Share
जनता कर्फ्यूला सहकार्य करा - इंदोरीकर महाराज, Latest News People Curfew Help Indorikar Maharaj Statement Sangmner

संगमनेर (प्रतिनिधी) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोरोना संदर्भातल्या आवाहनाला सर्वांनी सहकार्य करा. आपलं गाव, आपले शहर, आपला देश यातून मुक्त करायचा असेल तर हे कुणा एकट्याचे व प्रशासनाचे काम नसून सर्वांचा लढा आहे, तेव्हा जनता कर्फ्यूला सहकार्य करा, आपला देश कोरोना मुक्त करा, असे आवाहन समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

इंदोरीकर महाराज यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात 63 जणांना कोरोना सारख्या आजाराने बाधित केलेले आहे. त्यामुळे आपले गाव, आपले शहर, आपला देश मुक्त यातून करायचा असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. व ती गरजेची आहे. हा कोण्या एकट्या दुकट्या व निव्वळ शासन, प्रशासनाचा लढा नाही तर तो सर्वांचा आहे.

तेव्हा सर्वांनी खबरदारी घ्या, सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, प्रत्येकाने आपण आपले कुटुंब कोरोना विषाणूपासून दूर ठेवा, घराबाहेर पडू नका, प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या, व शासनाला सहकार्य करा, मी पण घरी आहे, तुम्ही पण बाहेर पडू नका, असे आवाहन इंदोरीकर महाराज यांनी केले आहे. इंदोरीकर यांचे सर्व कार्यक्रम 31 मार्च पर्यंत रद्द करण्यात आले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!