Wednesday, April 24, 2024
Homeनगरपाथर्डी तालुक्यातील 25 व्यक्तींसह 33 जणांचे अहवाल निगेटिव्ह

पाथर्डी तालुक्यातील 25 व्यक्तींसह 33 जणांचे अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे येथील एका व्यक्तीचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 25 व्यक्तींचे करोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती वैद्यकीय विभागाच्या सुत्रांनी दिली.

शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे 37 व्यक्तींच्या घशातील स्त्राव अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील अहवालापैकी 33 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यात, पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे येथील 25 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आता उर्वरित 4 अहवालाची प्रतीक्षा आहे.

- Advertisement -

131 व्यक्ती रुग्णालयात
जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात 113 करोना संशयीत, एकावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दोघांवर एम्स हॉस्पिटलमध्ये तर 15 करोना बाधीतांवर बुथ हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

890 होम क्वरांटाईन
करोना बाधीतांच्या संपर्कात आलेल्या मात्र बाधीत नसणार्‍या अथवा बाहेरच्या ठिकाणाहून आलेल्या जिल्ह्यातील 890 व्यक्तींना सध्या होम क्वरांटाईन करण्यात आले आहे. तर 259 व्यक्तींना संस्थापक क्वरांटाईन करण्यात आले असून जिल्हास्तरावर 115 व्यक्ती क्वरांटाईन असल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांच्यावतीने सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या