Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशमाजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा

माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या पूर्व प्रेसिडेंट मुशर्रफचा देशद्रोहाच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकर अहमद यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय सुनावला.

दरम्यान यापूर्वी विशेष न्यायालयाने या प्रलंबित देशद्रोह खटल्यावर १७ डिसेंबर रोजी निकाल देणार असल्याची घोषणा केली होती. वास्तविक त्यावेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण न होता देखील ही घोषणा केल्याने अनेक प्रश्न उभारले गेले होते, मात्र आज अखेरीस या खटल्यावरी निर्णय आला असून लवकरच शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पाकिस्तान मुस्लिम लीगच्या नवाझ शरीफ यांच्या सरकारने परवेझ मुशर्रफ यांच्या विरुद्ध नोव्हेंबर 2007 च्या संविधानबाह्य अतिरिक्त आणीबाणी वरून याचिका दाखल केली होती.

नोव्हेंबर २००७ पासून मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालू आहे. तीन नोव्हेंबर 2007 रोजी देशावरील प्रकरण चालू आहे. पाकिस्तानातील मुस्लिम लीग नवाज सरकार या पूर्व सरकारच्या काळात हा खटला दाखल करण्यात आला आहे. २०१३ मध्ये खटला दाखल करण्यात आल्यानंतर डिसेंबर २०१४ मुर्शरफ यांना दोषी ठरविण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या