Saturday, April 27, 2024
Homeनगरनगर : थकबाकीदारांचे कनेक्शन कट

नगर : थकबाकीदारांचे कनेक्शन कट

एमएसईबीची कारवाई दोन वीज चोर सापडले

अहमदनगर (प्रतिनिधी) – थकबाकी वसुलीची मोहीम कठोर करत एमएसईबीने आज 32 नगरकरांचे कनेक्शन कट केले. या तोडातोडीच्या मोहिमेत दोन वीज चोरही एमएसईबीच्या जाळ्यात अडकले. त्यांची चौकशी सुरू असून कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यभरात सध्या महावितरणने थकबाकी वसुली मोहीम सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये थकबाकी जमा करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. आता महावितरणने नगर शहरासह जिल्ह्यामध्ये वसुलीसाठी कनेशक्शन कट करण्याची मोहीम सुरू केली आहे.

नगर शहरातील तेलिखुंट, दिल्लीगेट, सावेडी, फकिरवाडा या वीज मंडळाच्या केंद्रातील कर्मचार्‍यांनी 32 जणांचे वीज कनेक्शन आज कट केले. थकबाकीदराना महावितरणने नोटीस बाजवली होती नोटीस बजावून सुद्धा पैसे न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. नगर शहरातील रामवाडी, गोकुलवाडी, सर्जेपुरा, कोठलासह विविध ठिकाणचे वीज कनेक्शन आज तोडले. झोपडपट्टी भागातील दोन वीज चोर पथकाला मिळाले. त्याची चौकशी सुरू आहे.

तीनशेपेक्षा जास्त रुपयांची थकबाकी असणार्‍यांना नोटीस दिल्या होत्या. नोटिसा देऊन सुद्धा पैसे भरले नाहीत, त्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. थकबाकीदारांनी तातडीने पैसे भरावेत अन्यथा वीज कनेक्शन कट केले जाईल.
– नितीन धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता, एमएसईबी.

- Advertisment -

ताज्या बातम्या