Thursday, May 2, 2024
Homeनगरशाळा बंद…शिक्षण सुरू….

शाळा बंद…शिक्षण सुरू….

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान व इंटरनेटच्या साह्याने दूरस्थ शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांची अध्ययन-अध्यापन व मुल्यमापन प्रक्रिया सुरू आहे.

विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या कोरोनाचे संपूर्ण जगावर संकट कोसळलेले आहे अशावेळी भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी लॉक डाऊन सुरू केलेले आहे . सर्व शिक्षण संस्था बंद आहेत. विद्यार्थी पालकांसोबत घरी आहेत. मग अध्ययन अध्यापन मूल्यमापन ही शिक्षणप्रक्रिया चालू राहावी म्हणुन महादजी शिंदे विद्यालयाने दूरस्थ शिक्षण पद्धतीसाठी इंटरनेट या माध्यमाचा प्रभावी पद्धतीने उपयोग करून घेण्याचे ठरवले आहे. विद्यालयात सध्या एकूण 1800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि एकूण 32 वर्ग आहेत. प्रत्येक वर्गाचे व्हाट्सअप ग्रुप बनवलेले आहेत. शिक्षक वेगवेगळ्या व्हिडिओज, पावर पॉइंट प्रेझेंटेशन यांचा प्रभावी वापर व्हाट्सअप द्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी करत आहेत.

- Advertisement -

वर्षभरातील कामकाजाचे मूल्यमापन आकारिक मूल्यमापन द्वारे करण्यात आले. संकलित चाचणी क्र. दोन अर्थात सत्र दोन परीक्षा घ्यावयाची ‘कोरोणा लॉक डाऊन’ मुळे राहिलेली आहे.

अशा स्थितीत विद्यालय प्रशासन व विद्यालयातील सर्व तंत्रस्नेही शिक्षक यांच्या माध्यमातून ‘TESTMOZ’ या ॲप द्वारे सर्व वर्ग वर्गांच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना कुठलेही अभ्यासाचे दडपण न देता शब्द कोडी,गणिती सूत्रे, ऐतिहासिक सनावळ्या,वैज्ञानिक याबाबत आनंददायी पद्धतीने वाटतील अशा प्रश्नपत्रिका व कृतीपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन तर होईलच तसेच विद्यार्थ्यांमध्ये तंत्रस्नेहीपणा वाढीस लागेल. नव्या युगाला आवश्यक अशा टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याचे प्रशिक्षण अप्रत्यक्षरीत्या मिळेल असा विद्यालयास विश्वास वाटतो.

तसेच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून अंमलबजावणी केली जाणार आहे या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेपासून दूर न जाता त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्याला आनंददायी पद्धतीने वाव देणे हा आहे अशी माहिती दिली.

या दूरस्थ शिक्षणातून अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन पद्धतीचा कल्पना, प्रत्यक्षात निर्मीती ,नियोजन अंमलबजावणी करण्यासाठी विद्यालयाचे उपप्राचार्य बाळासाहेब जाधव ,पर्यवेक्षक उत्तम बुधवंत ,गुणवत्ता कक्ष प्रमुख सुधीर साबळे, गुरुकुलप्रमुख विलास लबडे ,ज्येष्ठ शिक्षक विलास दरेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या