Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सावधान, ऑनलाईनद्वारे होऊ शकते फसवणूक

Share
सावधान, ऑनलाईनद्वारे होऊ शकते फसवणूक, Latest News Online Froud Cyber ​​Cell Ahmednagar

लॉकडाऊनमध्ये नवनवीन फंडे : सायबर सेलकडून दक्षता घेण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटाने सर्वत्र भितीदायक वातावरण निर्माण केले आहे. श्रीमंतापासून ते कष्टकरी मजुरांपर्यंत सर्वांच्याच डोक्यावर कोरोनाने भयाची टांगती तलवार आहे. सारेजण यामुळे हवालदिल आणि भयभीत झालेले असले तरी काहींसाठी कोरोनाचे संकट इष्टापत्ती ठरत आहे. या साथीतून ते आपल उखळ पांढर करून घेत आहेत. कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे बंद असताना सायबर गुन्हेगारांचा पैसे कमवण्याचा उद्योग सुरु आहे. यामुळे लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. लॉकडाऊन काळात या गुन्हेगारांकडून ऑनलाइन फसवणूक होण्याची शक्यता आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत आहे. सध्या देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे सर्व उद्योगधंदे ठप्प आहेत. या काळात ऑनलाइन सायबर फसवणूक करणार्‍या भामट्यांनी नवनवीन फंडे तयार केले आहेत. सर्व लोक घरात असल्याने मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक लिंक व्हायरल होत आहेत. नेमके त्याच लिंक मधून फसवणूक होण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बनावट लिंकमधून सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्याची माहिती प्राप्त करून सायबर गुन्हेगार बँकेतील रक्कम काढून घेऊ शकतात. मोबाईलवर विविध लिंक पाठवून किंवा लिंक असलेल्या जाहिरातीद्वारे सर्वसामान्य नागरिकांचा डाटा प्राप्त करून ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली जाते. याबाबत मुंबई येथील महाराष्ट्र सायबर सेल व नगरच्या सायबर सेलने फसवणूक होणार्‍या काही लिंकची माहिती प्राप्त केली आहे.

या लिंकद्वारे होऊ शकते फसवणूक
प्रधानमंत्री बेरोजगार योजनेच्या नावाखाली
लॉकडाऊन काळात फ्री नेट लिंकद्वारे
जीओ कंपनीतर्फे 498 चे फ्री रिचार्जच्या लिंकद्वारे
प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे 25 हजारांचे आमिष दाखवून
आरोग्य मंत्रालयातर्फे घरी असलेल्यांना 60 जिबी नेट फ्री लिंकद्वारे

  • फसवणूक टाळण्यासाठी नियम पाळा
  • अनोळखीची कोणतीही लिंक ओपन करू नका
  • अनोळखी लिंक सोबतचे कोणतेही फ्री संलग्न डाऊनलोड करू नये
  • आपल्याकडील कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलमध्ये चांगल्या प्रतीचा अँटिव्हायरस व महत्त्वाच्या फाईल्सचा बॅकअप घेऊन ठेवा.
  • कोणतेही अनोळखी अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करू नये.
  • कोणत्याही अनोळखी वेबपेजवर किंवा लिंकवर आपली वैयक्तिक माहिती देऊ नये.
  • अशा वेबसाईटबाबत त्वरीत सायबर सेलला माहिती द्यावी.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!