Thursday, April 25, 2024
Homeनगर‘ओडीएफ’मध्ये महापालिकेला ‘प्लस प्लस’ मानांकन

‘ओडीएफ’मध्ये महापालिकेला ‘प्लस प्लस’ मानांकन

केद्र सरकारच्या सर्वेक्षणात देशातील 141 शहरांच्या यादीत नगरचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- कचरामुक्त शहर सर्वेक्षणात अवघ्या ‘वन स्टार’ मानांकनाची नामुष्की आल्यानंतर नगर महापालिकेला ‘ओडीएफ’मध्ये प्लस प्लस मानांकन मिळाल्याने काहिसा दिलासा मिळाला आहे. देशातील 141 स्थानिक स्वराज्य संस्थांनाच हे मानांकन मिळाले असून, 141 शहरांमध्ये नगर शहराचा समावेश झाला आहे.
केंद्र सरकारने शहरातील स्वच्छतेचे जानेवारीमध्ये सर्वेक्षण केले.

- Advertisement -

त्यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार होता. त्यांनी सर्व यंत्रणा स्वच्छतेसाठी, स्वच्छता न पाळणार्‍यांवर कारवाईसाठी कामाला लावली होती. त्यामुळे त्यावेळी शहर उजळले होते. मंगळवारी (दि. 19) कचरामुक्त शहर स्पर्धेचे मानांकन जाहीर झाले. त्या पाठोपाठ बुधवारी (दि. 20) सार्वजनिक स्वच्छतागृहातील स्वच्छता व इतर सोयी सुविधांच्या (ओडीएफ) सर्वेक्षणाचे मानांकन जाहीर झाले. त्यामध्ये महापालिकेला ‘ओडीएफ प्लसप्लसफ’ असे मानांकन मिळाले.

स्वच्छता सर्वेक्षणच्या सहा हजार पैकी 700 गुण यामुले महापालिकेला मिळाले आहेत. अद्याप साडेचार हजार गुणांचा निकाल येणे बाकी आहे. स्वच्छता सर्वेक्षण मोहीम सुरू होण्यापूर्वी नगर शहर स्वच्छतेबाबत भारतात 200 व्या क्रमांकावर होते. स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत नगर कचरामुक्त व हागणदारीमुक्त करण्यासाठी परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्यामुळे या कामास वेग आला होता. महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, तत्कालीन उपायुक्त सुनील पवार, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेंद्रकुमार सारसर, भारत स्वच्छता अभियानाचे तत्कालीन समन्वयक सुरेश भालसिंग, प्रकल्प विभागप्रमुख राजेंद्र मेहेत्रे आदींसह महापालिका अधिकारी-कर्मचार्‍यांनी शहर स्वच्छतेचे नियोजन केले होते.

नगर शहर थ्री-स्टार करण्याचा चंग महापालिकेने बांधला होता. कचरामुक्त शहरमध्ये नगर महापालिकेला एक स्टार तसेच 200 गुण मिळाले आहेत. आज ओडीएफ प्लसप्लसचा निकाल जाहीर करण्यात आला. यात नगरला 500 पैकी 500 गुण मिळाले. आता स्वच्छता सर्वेक्षण, रिपोर्टिंग व नागरिकांचा सहभाग या बाबतचे निकाल जाहीर होणार आहेत. या नॉर्म्ससाठी साडेचार हजार गुणांचे वितरण होणार आहे. नगर शहराला यातून किमान 11 कोटी रुपयांचे बक्षीस केंद्राकडून मिळणे अपेक्षित आहे. येत्या दोन दिवसांत स्वच्छता सर्वेक्षण, रिपोर्टिंग व नागरिकांचा सहभागाबाबतच्या गुणांचे वितरण होणार आहे. त्यानंतर नगर शहर थ्रीस्टार झाल्याचे निश्चित होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या