Friday, April 26, 2024
Homeनगरनगर – जिल्ह्यात वादळात एक ठार, चौघे जखमी तर 23 जनावरे दगावली

नगर – जिल्ह्यात वादळात एक ठार, चौघे जखमी तर 23 जनावरे दगावली

अहमदनगर (प्रतिनिधी) – निसर्ग वादळाने दिलेल्या तडाख्यात बुधवारी जिल्ह्यात अनेक तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारे नुकसान झाले आहेत. अकोले तालुक्यातील एका व्यक्तीचा अंगावर भिंत पडून, तर अन्य चौघे जखमी झाले आहेत. यासह 23 जनावरे दगावली असून 787 घरांचे शंभर टक्के आणि अंशत: नुकसान झाले आहे. यासह सर्वाधिक पारनेर तालुक्यातील 540 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून जिल्ह्यातील एकूण 632. 3 हेक्टरवरील शेतीचे नुसान झज्ञलेले आहे.

जिल्हा प्रशासनाने गुरूवारी दुपारी दिलेल्या नुकसानाची प्राथमिक महितीनूसार जिल्ह्यात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्री वादळामुळे अकोले तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू, तर शेवगावमध्ये 2 आणि नगर आणि संगमनेरमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा जखमींमध्ये समावेश आहे. यासह 23 जनावरे दगावली आहेत. यात सर्वाधिक संगमनेर 7, पारनेर 5, अकोले 4, राहाता तालुक्यातील 3 जनावरांचा यात समावेश आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील 531 घरांचे अंशत:, अकोले 45, पारनेर 44, राहुरी 17, श्रीगोंदा 13,  कोपरगाव आणि पाथर्डीत प्रत्येकी 10, नेवासा 8 आणि अकोल्यात 8, राहुरी 5, संंगमनेर 4 आणि कोपरगाव आणि नेवासा प्रत्येकी 2 पक्क्या घरांचे अंशत: आणि राहुरी आणि संगमनेरमधील प्रत्येकी 2 घरांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. पारनेर तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले असून यात 540 हेक्टवरील पिके, पाथर्डीत 76, श्रीगोंदा 9.5, कोपरगाव 3.4 आणि नेवासा 2.6 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. बाधित झालेल्या तालुक्यात अकोले, संगमनेर, नेवासा आणि पारनेर तालुक्यात अधिक नुकसान आहे.

चार दिवसात 1 हजार 31 मि.मी. पाऊस
अकोल्यात 91, संगमनेर 55, कोपरगाव 49, श्रीरामपूर 40, राहुरी 5.8, नेवासा 4, राहाता 37, नगर 2, शेवगाव 1, पाथर्डी 0, पारनेर 16, कर्जत 6, श्रीगोंदा 5.5 आणि जामखेड 4 असा एकूण 314 मि.मी. पाऊस जिल्ह्यात बुधवारी झाला असून गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात 1031 मि.मी. पाऊस असून जिल्ह्याच्या सरासरीच्या 14. 29 टक्के पाऊस झालेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या