Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

निंबळक गावात औषध फवारणी

Share
निंबळक गावात औषध फवारणी, Latest News Nimbalak Corona Spray Drug Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातही उपाययोजना केल्या जात आहेत. निंबळक (ता. नगर) येथील ग्रामपंचायतने गावात वाड्या-वस्तीवर जाऊन मास्कचे वाटप करुन कोरोना संदर्भात माहिती दिली. तसेच गावात ब्लोअरच्या सहाय्याने निर्जंतुकीकरणासाठी सोडियम क्लोराइडची फवारणी करण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी निंबळक ग्रामपंचायतने अनेक खबरदारीच्या उपाययोजना केल्या. गावातील मुख्य रस्ते, वसाहती व वाडी वस्त्यांवर निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करुन कोरोना संदर्भात जनजागृती केली. मेडिकल, अन्नधान्य पुरवठा केंद्र, किराणा दुकान येथे सोशल डिस्टस्टिंग अऩिवार्य केले. नागरिकही सुचनांचे पालन करत आहेत. तसेच बाहेर ठिकाणाहून आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का देऊन त्यांना घरातच थांबण्याचे निर्देश देयात आले.

आरोग्य विभागही त्यांच्यावर लक्ष ठेऊन असल्याचे माजी सरपंच विलास लामखडे यांनी सांगितले. गावात कोरोनाच्या दक्षतेसाठी विलास लामखडे, उपसरपंच घनश्याम म्हस्के, आरोग्य सेवक डॉ. दिगंबर कोल्हे, ग्रामसेवक अनिल भाकरे, परवीनबानो सय्यद, ग्रामपंचायत सदस्य नाना दिवटे, बाबा पगारे, अशोक शिंदे, महसुलचे रामदास शिंदे, अशोक पवार, छबू कोरडे, सुभाष कोरडे, बबन कदम, रुक्मिणी रोकडे, कमल कदम, नवाझ शेख, साहेबराव मदने, रुपाली होळकर परिश्रम घेत आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांचे मार्गदर्शन आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!