Thursday, April 25, 2024
Homeनगरनेवाशाच्या तरूणाला कोरोना व्हायरस नाही

नेवाशाच्या तरूणाला कोरोना व्हायरस नाही

अहमदनगर (प्रतिनिधी) – चीनमधून नुकत्याच परतलेल्या नेवाशाच्या तरूणाचे रक्त व घशातील द्रवाच्या नमुने जिल्हा रूग्णालयाने घेतले होते. तपासणीसाठी ते पुण्याला पाठवण्यात आले होते.

त्याचा तपासणी अहवाल रविवारी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला. अहवाल येताच डॉक्टरांसह अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्या तरूणाला कोरोनो व्हायरस नसल्याचे अहवालातून समोर आले आहे. त्याला रविवारी दुपारनंतर जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाढे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या