Thursday, April 25, 2024
Homeनगरनेवाशात ‘संविधान बचाव’चा तहसीलवर मूकमोर्चा

नेवाशात ‘संविधान बचाव’चा तहसीलवर मूकमोर्चा

केरळच्या धर्तीवर नागरिकत्व कायद्याविरोधात विधानसभेत प्रस्ताव मंजूर करा

नेवासा (शहर प्रतिनिधी) – नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती व प्रस्तावित एनआरसी व एनपीआरला असलेला नागरिकांच्या विरोधाची दखल घेऊन केरळच्या धर्तीवर विधानसभेत राज्य सरकारने या कायद्याविरोधात प्रस्ताव मंजूर करावा, या मागणीसाठी तसेच सीएए-एनआरसी व एनपीआर कायद्याच्या विरोधात संविधान बचाव समितीच्या वतीने शनिवारी नेवासा शहरात जनआक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील मुस्लीम बांधव आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते.

- Advertisement -

नेवासा येथील ईजतेमा मैदानापासून आक्रोश मूक मोर्चाला प्रारंभ झाला.एनआरसी नको रोजगार पाहिजे, वापस लो एनआरसी-सीएए, संविधान बचाओ देश बचाओ, इन्कलाब जिंदाबाद, हम लेके रहेंगे आझादी, चलो कहे दे अलल ऐलान.. नही छोडेंगे हिंदुस्थान.. असे हातात विविध घोषणांचे फलक तसेच भारताचा तिरंगा ध्वज हातात घेऊन युवकही या मूकमोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मूकमोर्चा सुरू होण्यापूर्वी शहरासह तालुक्यातून येणारे मुस्लीम बांधव शहराबाहेर असलेल्या इज्जतेमा मैदानावर जमा झाले होते. यावेळी आक्रोश मूक मोर्चात सहभागी झालेल्या युवकांना शांततेचे आवाहन करण्यात येत होते. दुपारी बारा वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. बसस्थानक, गणपती मंदिर चौक, नाथबाबा चौक येथून शिस्तबद्ध पद्धतीने आक्रोश मूकमोर्चा तहसील कार्यालयावर आला.

मोर्चा तहसील कार्यालय येथे पोहचल्यावर न्यू नॅशनल प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याच्या विरोधात आपली मते भाषणाद्वारे मांडली व सामूहिक ‘मेरे प्यारे वतन’ हे गीत म्हटले. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, नायब तहसीलदार संजय परदेशी व पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना निवेदन देण्यात आले. आक्रोश मूक मोर्चामध्ये शहर व तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या