Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोरडा अन् ओला दुष्काळ; नेवाशाच्या शेतकर्‍यांवर झाला संकटांचा मारा

Share
कोरडा अन् ओला दुष्काळ; नेवाशाच्या शेतकर्‍यांवर झाला संकटांचा मारा, Latest News Newasa Good By 2019

विधानसभेत परिवर्तनाची परंपरा कायम; गुन्हेगारीचा आलेख चढताच

नेवासा (का. प्रतिनिधी)- मावळते 2019 वर्ष निवडणुकांचे वर्ष होते. लोकसभा व विधानसभा निवडणुका या वर्षात झाल्या. त्याचबरोबर दुष्काळ, पावसाने दिलेली ओढ व अतिपावसाने केलेले होत्याचे नव्हते या सर्व संकटांचा सामना नेवाशातील शेतकर्‍यांना करावा लागला. तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख चढताच राहिला. अपघातांच्या घटनांमध्येही मोठी वाढ नोंदली गेली.

लोकसभा निवडणुकीत नेवासा तालुक्याने सेना-भाजपाच्या उमेदवाराला तालुक्यात मताधिक्य देत विजयी होण्यात हातभार लावला. विधानसभेत परिवर्तनाची परंपरा कायम राखत मुरकुटेंना घरी बसवत शंकरराव गडाखांना आमदार केले. गेल्यावेळी भाजपा-सेनेची सत्ता होती व आमदार भाजपाचा होता. आता महाविकास आघाडीची सत्ता आहे व गडाखांनी आधीच शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे नेवासा तालुक्याच्या विकासाची कामे मार्गी लागण्याच्या अपेक्षा जनतेत निर्माण झाल्या आहेत. निवडणुकीत घुले बंधूंसह राष्ट्रवादीचा मिळालेला पाठिंबा गडाखांना उपयोगी ठरला.

गेल्यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी उन्हाळ्यात दुष्काळाचे भीषण चटके जनतेला जाणवले. मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने मोठ्या संख्येने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागला. पिण्याच्या पाण्याच्या सोनई-करजगाव तसेच गळनिंब पाणीपुरवठा योजनेचे रडगाणे वर्षभर कायम राहिले. निदान पावसाळा वेळेवर सुरू होईल असे वाटत होते मात्र तेही घडले नाही. थोड्या पावसावर खरीपाची लागवड शेतकर्‍यांनी केली परंतु दीड महिने पावसाने ओढ दिल्याने खरीप हातचा जाण्याची स्थिती ओढवली. त्यानंतर जो संततधार पाऊस झाला तो एवढा झाला की आलेले खरीप पाण्यात गेले. शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान या पावसाने केले. कांदा पिकच नष्ट केल्याने जानेवारीत 500 रुपये क्विंटलने गेलेला कांदा नोव्हेंबरमध्ये 15000 रुपये क्विंटलपर्यंत गेला. मात्र तेव्हा 95 टक्के शेतकर्‍यांकडे कांदाच शिल्लक नव्हता. एवढा विरोधाभास कांद्याच्या बाबतीत या वर्षभरात अनुभवावयास आला. अतिवृष्टी नुकसानभरपाईची शेतकर्‍यांना अजूनही प्रतिक्षाच करावी लागत आहे. शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा डिसेंबरमध्ये झाल्याने शेतकर्‍यांना थोडा दिलासा मिळाला एवढेच काय ते या वर्षात शेतकर्‍यांसाठी चांगले घडले.

नेवासा तालुक्यात वर्षभरात रस्ते अपघातांसह विज धक्क्याचे अनेक अपघात घडले. लोंबकळलेल्या वीजेच्या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन मोठ्या संख्येने शेतकर्‍यांच्या उसाला आग लागण्याच्या घटना घडल्या. वाळूचोरी, अवैध व्यवसाय व चोर्‍या या गुन्ह्यांतही वाढच झाली. शिक्षण क्षेत्रात दहावी व बारावीच्या तालुक्याच्या निकालात घट झाली.

कृषी-

जानेवारीत कवडीमोल भावामुळे कांदा उत्पादक चिंतेत
नेवासा तालुक्यात पहिल्या टप्प्यात 13 गावातील शेतकर्‍यांचे खरीप दुष्काळ पिक अनुदान बँकेत वर्ग
प्रवरेतील जायकवाडीचा जलफुगवटा संपला; बहिरवाडी, मुरमे, खडका, टोका, जळके परिसरातील शेती पिके धोक्यात (मार्च)
जायकवाडीत मृतसाठाच राहिला या अधिकार्‍यांच्या घोषणेविरोधात जलसंपत्ती प्राधिकरणाकडे दावा दाखल
पिण्याच्या आवर्तनातून बंधारे भरले न गेल्याने सलाबतपूरसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये संताप (एप्रिल)
गोधेगावात विषारी गवताच्या मुळ्या खाल्ल्याने शंभरहून अधिक शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू (जून)
कुकाण्यात कृषी सेवा केंद्र चालकाला बोगस कपाशी बियाणे विकताना छापा टाकून पकडले (जुलै)
लाख कालवा नुतनीकरण कामाला वेग
घोगरगाव व जैनपूरला पुराचा वेढा; 500 जण सुरक्षितस्थळी हलविले (ऑगस्ट)
खरवंडीच्या तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

राजकारण-
लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना तालुक्यात मताधिक्क्य तर विधानसभा निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख विजयी
क्रांतिकारीचे शंकरराव गडाख यांना विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. गडाख-घुले बंधूंचे झाले मनोमिलन
विधानसभा निवडणूक प्रचारकाळात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी केला भाजपात प्रवेश
अतिक्रमणाच्या कारणावरुन जानेवारीत नेवाशाच्या नगरसेविकेचे पद रद्द; अपिलात तत्कालीन मंत्र्यांकडूनही त्यावर शिक्कामोर्तब मात्र डिसेंबरमध्ये नव्या सरकारमधील मंत्र्यांकडून पद कायमचा निकाल
गढूळ पाण्याने नेवासा नगरपंचायतीचे राजकारण अनेकदा गढूळले
शालिनी लांडे यांना तलवार दाखवून धमकी दिल्याप्रकरणी वैभव शेटे व शुभम बंबवर गुन्हा दाखल
विविध ग्रामपंचायत निवडणुकीत क्रांतिकारीचे वर्चस्व
नेवाशाच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत क्रांतिकारीचे उमेदवार विजयी
पाणी प्रश्नावरील आंदोलनांप्रकरणी शंकरराव गडाखांना अटक वॉरंट

सहकार-
राज्य सहकारी बँकेकडून साखर मुल्यांकनात 100 रुपयांची वाढ (फेब्रुवारी)
दुष्काळामुळे उन्हाळ्यात तालुक्यातील उसाची मोठ्या प्रमाणात चार्‍यासाठी विक्री
साखरेच्या भावात सुधारणा झाल्याने कारखान्यांना दिलासा
ठाकरे सरकारकडून कर्जमुक्तीच्या घोषणेत अपात्र ठरवले गेल्याने सहकारी संस्थांच्या संचालकांमध्ये नाराजी
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदारयाद्या बनवण्याचे काम सुरू

शिक्षण-
तालुक्याचा दहावीचा निकाल 15.85 टक्क्यांनी तर बारावीचा 4.86 टक्क्यांनी घटला
खरवंडीत यावर्षीपासून दहावीचे परीक्षा केंद्र
मुळा शैक्षणिक संस्थेला सिल लावण्याच्या झाल्या हालचाली
बारावी परीक्षेच्यावेळी आवारात थांबू न दिल्याच्या कारणावरुन दोघा शिक्षकांना मारहाण करुन तलवार उगारली
नेवाशात निवडणूक प्रशिक्षणादरम्यान शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू

अपघात-

कांगोणी फाट्याजवळ खासगी बस-टँकर अपाघातात 3 ठार 24 जखमी (फेब्रुवारी)
ऊस वाहतूक करणार्‍या डबल ट्रॉली ट्रॅक्टरच्या धडकेने अपघाताच्या तीन घटनांमध्ये तिघे ठार (डिसेंबर)
खडकाफाटा येथे दुचाकी अपघात; मायलेक ठार (जुलै)
लोहगावात शेततळ्यात बुडून दाम्पत्याचा मृत्यू (मार्च)
खांबावर काम करताना शॉक बसून बहिरवाडीच्या कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू
निंभारी येथे महावितरणच्या वीज तारेला चिकटून बालकाचा मृत्यू (जानेवारी)
नेवासाफाटा येथे महिला एसटी वाहकाचा मोटारसायकल धडकेत मृत्यू (ऑगस्ट)
निंभारीत टेम्पो धडकेत दुचाकीस्वार ठार
सौंदाळ्यानजीक अ‍ॅपेरिक्षा इंडिकावर धडकल्याने एक ठार; 12 जखमी (जुलै)
देवगडफाटा येथे बस-मोटारसायकल धडकेत एक ठार; तिघे जखमी (जून)

क्राईम-

वाळूचोरीबाबत तालुक्यात जागृती झालेली असतानाही वाळूचोरीच्या अनेक घटना; अनके ठिकाणी वाहने पकडली; खरवंडीत मातीमिश्रीत वाळूच्या नावाखाली वाळूउपसा
पाचेगावात डिसेंबरमध्ये वाळूउपसा करणार्‍या दोन तराफा ग्रामस्थ व महसूलने केल्या नष्ट
एलसीबीचे तसेच स्थानिक पोलिसांचे दारु, मटका अड्ड्यांवर अनेकदा छापे मात्र व्यवसाय तेजीतच
कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला 3 वर्षे सक्तमजुरी
श्रीरामपुरात शिकणार्‍या नेवाशाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला हरेगाव फाटा व भानसहिवरे येथे मारहाण;हवेत गोळीबार
नेवाशात घरफोडी करणारे दोघे आरोपी जेरबंद
भानसहिवरेत दफनभूमी उकरल्याच्या आरोपावरुन प्रतिष्ठितांवर गुन्हे दाखल
भेंडा येथून 4 टन उसासह ट्रॅक्टर ट्रॉलीची तर मुळा कारखाना येथून ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरची चोरी
चांदा येथून अपहरण करून मारहाण; 5 जणांवर गुन्हा दाखल (फेब्रुवारी)
नगर-औरंगाबाद रस्त्यावर लूट करणार्‍या टोळीतील एकाला अटक
नेवासाफाटा येथे बांधकाम उपअभियंत्याच्या बंगल्यात गळ्याला चाकू लावून चोरी
नांदूरशिकारी शिवारात फायनान्स कंपनीच्या एजंटाला अडवून दीड लाखाची लूट
जळके खुर्द शिवारात सराफाला कार अडवून लुटले
सोनई पोलीस ठाण्यासमोर लाच स्विकारताना हवालदार भिंगारदिवेंना पकडले
घोडा-बैलगाडीच्या शर्यतीच्या आयोजन प्रकरणी भानसहिवरेच्या 9 जणांवर गुन्हा दाखल
जेऊरहैबती येथे जमिनीच्या वादातून दोघांची हत्या
नेवाशातील स्टेट बँकेतून अडीच हजाराची रोकड चोरीस
कौठा येथे ऑनर किलींगची घटना
कुकाण्यात आढळले स्त्री जातीचे नवजात अर्भक
खडका फाट्यानजीक आढळलेल्या महिलेच्या मृतदेहप्रकरणी दोन हत्यांचे प्रकरण उघड
कौठा येथे ऑनर किलींगची घटना
आरामबसच्या डिक्कीतून शेकडो मोबाईलची चोरी; चौघांना अटक
गणेशवाडीच्या तिहेरी खून प्रकरणातील आरोपींच्या फाशीवर उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब
खरवंडीत भरदुपारी घरफोडी; 3
लाखांचा ऐवज लंपास

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!