Type to search

Featured आवर्जून वाचाच नाशिक

यंदाच्या नवरात्री उत्सवातील काही हटके ट्रेंड्स!

Share

नाशिक | सना शेख

प्रत्येक वर्षी नवरात्री उत्सवात नवनवीन ट्रेंड्स पाहायला मिळतात असेच काही नवीन ट्रेंड्स यावर्षीही सुद्धा पाहायला मिळत आहेत. काही नवीन गोष्टी आहेत जे सगळ्यात आकर्षित करत आहेत. जाणून घेऊया यावर्षी कोणत्या गोष्टी ट्रेंडींगला आहेत.

आपला ड्रेस हटके व आकर्षक असावा अशी प्रत्येकाची भावना असते. खास करून नवरात्रीत कपड्यान बद्दलची विविधता पाहायला मिळते. नवरात्री उत्सवातील नऊ दिवस प्रत्येक जण आपापल्या लूक्स आणि कपड्यांबद्दल उत्साहित असतात. महिलावर्गा मध्ये आउटफिट बद्दल जास्त क्रेज पाहायला मिळतो.

ट्रेडिशनल लहंगा

ट्रेडिशनल लहंगा हा पूर्वी पासूनच वापरात असलेला आणि सर्व वयातील मुलींना महिलांना सूट होईल असा आहे. ट्रेडिशनल लहंग्यावर स्टोन ज्वेलरी ट्राय केली तर एक सगळ्यांपेक्षा वेगळे लूक मिळतो.

राजस्थानी लहंगा

जर आपली राजस्थानी कल्चरला पसंती असेल तर राजस्थानी लहंगा हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. राजस्थानी लहंग्यावर बरचसे वर्क केलेले असते आणि एक वेगळेपण देण्याचे काम करते. लहंग्यामध्ये तुम्ही कंफर्टेबल तर रहालचं आणि सोबतच तुम्हाला पारंपरिक लुक देते.

काठियावाडी लहंगा

गुजराती गरबा म्हटलं की काठियावाडी लहंगा आलाच. काठियावाडी लहंगा एक चांगली चॉइस ठरू शकते. केवळ जर तुम्ही यावर मल्टी रंगाची चुनरी यूज केली तर.

टँँटू

पाठ, मान आणि कमरेवर टँँटू बँँकलेस ब्लाउज घातल्या नंतर पाठ, मान व कमरेवर टँँटू ट्रेंडमध्ये आहे. तुमच्या आवडीनुसार टँँटू काढू शकता.

वॉटरप्रूफ मेकअप

नवरात्री उत्सवात गरबा खेळते वेळी घामाने मेकअप खराब होतो. गरबा खेळते वेळी सुंदर दिसण्यासाठी वॉटरप्रूफ मेकअप ट्रेंडींगला आहे.

बांगड्या आणि कंबरपट्टा

विविध रंगांच्या बांगड्या आणि कंबरपट्टा हे सुद्धा ट्रैंडींगला आहे. बांगड्या आणि कंबरपट्टा हे साडी आणि लहंगा या दोन्हीवर पण परिधान कराता येते.

कोल्हापुरी चप्पल

कोल्हापूरी चप्पल ट्रडिशनल कपड़यावर खूप छान प्रकारे सूट करते. याचा देखील वापर तुम्ही करु शकता.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!