Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशउद्योगांच्या विस्तारासाठी ५० हजार कोटी; लघु- कुटीर उद्योगांना गॅरंटी शिवाय तीन लाख...

उद्योगांच्या विस्तारासाठी ५० हजार कोटी; लघु- कुटीर उद्योगांना गॅरंटी शिवाय तीन लाख कोटींचे कर्ज : अर्थमंत्री

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले विशेष पॅकेज देशातील उद्योगांना दिलासा देणारे ठरले आहे. उद्योगांच्या विस्तारासाठी ५० हजार कोटी रुपयांची तरतूद या पॅकेजमध्ये करण्यात आली आहे. तसेच लघु- कुटीर उद्योगांना गॅरंटी शिवाय तीन लाख कोटींचे कर्ज वितरित करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत २० लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज या पॅकेजबाबत विस्ताराने माहिती दिली. या पॅकेजबाबत माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, या पॅकेजमध्ये उद्योजगांना विचारात घेण्यात आले आहे. विकासदरात वाढ आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अशा पॅकेजची आवश्यकता होती.

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आत्मनिर्भर भारताचा अर्थ सांगताना आत्मनिर्भर म्हणजे देशाचे विलगीकरण करणे नव्हे तर लोकल ब्रँड ना ग्लोबल बनवणे हे उद्देश आहेत असे सांगितले आहे.

या पॅकेजमध्ये उद्योगांना महत्वाचे स्थान देण्यात आले असून कुटीर लघु उद्योगांसाठी सहा योजना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. लघु कुटीर उद्योगांसाठी 3 लाख कोटींपर्यंत कर्ज देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. यामध्ये कर्ज घेणाऱ्यांना कोणतीही गॅरंटी ठेवावी लागणार नाही. ३१ ऑक्टोबर याचा पासून ४५ लाख लघु कुटीर उद्योगांसाठी फायदा होणार आहे. ज्यात १२ महिने मूळ रक्कम परतावा द्यावे लागणार नाही. एकूण चार वर्षांसाठी हे कर्ज मिळणार आहे.

उद्योगांची उत्पादकता वाढविण्यासाठी ५० हजार कोटींच्या विशेष फंडचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये
आजारी असलेल्या उद्योगांसाठी फंड ऑफ फंड ची योजना राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे MSME ची व्याख्या बदलून गुंतवणूकीची मर्यादा वाढवली जाईल, २५ लाख ते १ कोटी पर्यंतची गुंतवणूक आणि ५ कोटींचा व्यवसाय असेल तर अशा उद्योगात लघु उद्योगासाठीचे फायदे मिळणार अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. लोकल उद्योगांना २०० कोटींपर्यंतच्या सरकारी खरेदीत निविदा पाठवता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुढील दोन दिवस पत्रकार परिषद घेऊन टप्प्यात पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजचे वाटप करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या