Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशमे महिन्यात १२ दिवस बँक बंद राहणार; जाणून घ्या कारण

मे महिन्यात १२ दिवस बँक बंद राहणार; जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या या काळात कोणालाही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी बँका व त्यांच्या सर्व शाखा नियमितपणे सुरू ठेवण्यात आल्या आहेत. पण मे महिन्यात तब्बल बारा दिवस बँका बंद राहणार असून यामुळे ग्राहकांची तारांबळ उडणार आहे, हे नक्की.

दरम्यान लॉक डाऊनच्या काळात अनेक बँकांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. येत्या तीन मेपर्यंत हे लॉक डाऊन असणार आहे. त्यानंतरच निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही
परंतु पुढील काही दिवसांचे नियोजन करण्याचे नागरिकांना ठरवून ठेवले आहे.

- Advertisement -

यामुळे पैशांची चणचण भासणार आहे. परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. तसेच मे महिन्यातील सुट्टींच्या यादीमध्ये दुसरा आणि चौथा शनिवारसह रविवारचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातील सार्वजनिक सुट्ट्याच्या या यादीत समावेश करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या’ दिवशी बँका राहणार बंद 
3, 7, 8, 9, 10, 17, 21, 22, 23, 24, 25, 31

- Advertisment -

ताज्या बातम्या