Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

यशवंत पंचायत राज अभियानात नाशिक जि.प.प्रथम

Share

नाशिक । पंचायत राज व्यवस्थांच्या सक्षमीकरणाकरीता ज्या जिल्हा परिषदा,पंचायत समित्या व ग्रामपंचायती काम करतात त्यांना देण्यात येणार्‍या सन 2018-19 वर्षाकरिता यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारांची घोषणा करण्यात झाली आहे.यामध्ये नाशिक विभागातून नाशिक जिल्हा परिषद प्रथम आली आहे.गुरूवारी (दि.12) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

पंचायत राज संस्थाना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामाची स्पर्धा निर्माण करण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात.विभाग आणि राज्य अशा दोन स्तरांवर हे पुरस्कार देण्यात येतात. सन 2018-19 साठी राज्य स्तरावर जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग (प्रथम पारितोषिक),जिल्हा परिषद कोल्हापूर (द्वितीय पारितोषिक) आणि जिल्हा परिषद,यवतमाळ (तृतीय पारितोषिक) जाहीर करण्यात आले आहे.राज्य स्तरावर पंचायत समिती, कुडाळ, ता. सिंधुदुर्ग, पंचायत समिती, अचलपूर.जिल्हा अमरावती व पंचायत समिती राहाता जिल्हा अहमदनगर यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय व तृतीय प्राप्त झाला आहे.

नाशिक जिल्हा परिषद प्रथम
विभाग स्तरावर नाशिक विभागात अहमदनगर जिल्हयातील राहाता पंचायत समितीला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून नाशिक जिल्हयातील कळवण पंचायत समितीला व्दितीय तर इगतपूरी पंचायत समितीला तृतीय क्रमांक मिळाला आहे.विभाग स्तरावरील पुरस्काराची घोषणा सोमवारी (दि.9) ग्रामविकास विभागाकडून करण्यात आली आहे.

यात नाशिक विभागातून नाशिक जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक पटकविला आहे. नागपूर विभागातून वर्धा जिल्हा परिषद व औरंगाबाद विभागातून लातूर जिल्हा परिषद प्रथम आली आहे. पंचायत राज संस्थांचे कामकाज, संस्थेची रचना, कार्यपध्दती, क्षमतावृध्दी, कर्मचारी व्यवस्थापन आदी मुद्दयांवर जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांचे मूल्यांकन करण्यात करुन हे पुरस्कार देण्यात येतात.

पदाधिकार्‍यां निमंत्रण
या पुरस्काराचे गुरूवारी (दि.12) सकाळी 11 वाजता यशवंतराव प्रतिष्ठान मुंबई येथे राज्यपाल भगसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीम यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे.यासाठी नाशिक जि.प.अध्यक्षासह उपाध्यक्ष,सभापती,मुख्य कार्यकारी अधिकारी आदी अधिकार्‍यांना आमंत्रित करण्यात आले आहे

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!