Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सातपूर : श्रमिकनगरला एकाची गळफास घेत आत्महत्या

Share
सातपूर : श्रमिकनगरला एकाची गळफास घेत आत्महत्या Latest News Nashik Youth Suicide Shramiknagar Area

नाशिक। राहत्या घरात गळफास लावून घेत ३४ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.15) औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. भूषण युवराज गिरासे (३४ रा.उज्वल सोसा.महादेव मंदिराजवळ) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे.

गिरासे यांनी रविवारी आपल्या राहत्या घरातील लोखंडी पोलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मित्र प्रवीण येवले यांनी त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!