Type to search

Featured नाशिक

Video: नाशिक मधील मुलांचे 30 तास चित्रीकरण

Share

नाशिक | अनिल पाटणकर

“तुझ्या नखऱ्यावर पोरी झालो मी फिदा” या आशयाचे एक धमाल गाणे नाशिकच्या तरुणांनी बनवले असून ते गाणे सुमीत म्युझिकच्या यु ट्यूबवर धुमाकूळ घालत आहे, सलग 30 तास या गाण्याचे चित्रीकरण त्र्यंबकेश्वर येथील ‘ग्रीन व्हॅली रिसॉर्ट’ येथे चालू होते. असे निर्माते पार्थसारथी राजेंद्र चव्हाण यांनी डिजिटल देशदुतशी बोलतांना सांगितले.

सिया क्रिएशन व MDR अँँड सन्स फिल्म्स यांची प्रस्तुती असलेले गाणे हिना पात्रुडकर यांनी निर्मित केले आहे, याचे दिग्दर्शन विशाल दवंगे यांनी अप्रतिम अशी कामगिरी केली आहे, सचिन जाधव, इंद्रजीत पवार, यांनी टेक्निकल बाबी सांभाळात सागर जाधव यांचे कडून नृत्यदिग्दर्शनाची कामगिरी चोख पार पडून घेतली.

गाण्याचे संकलन समर्थ धावणे याने केले असून या गाण्याला देवदास चित्रपटाचे छाया चित्रणसंचालक दाउद अली हे होते, नाशिक मधील कलाकारांबरोबर काम करायला आवडेल असे दाउद अली यांनी नमूद केले. हे गाणे सौरभ व करिष्मा यांच्यावर चित्रित केले असून याचे शब्द सौरभ पात्रुडकर यांचे आहेत तसेच मिलिंद मोरे यांनी संगीत संयोजन केले तर इंडियन आयडॉल फेम प्रसन्नजीत कोसंबी याच्या आवाजाच्या खास शैलीत तुझ्या नखऱ्यावर हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. एकूणच खूप कमी कालावधीत जास्त मेहनत घेऊन या तरुणांनी बनवले हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!