Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमुंबई-आग्रा महामार्ग अपघातात युवक ठार

मुंबई-आग्रा महामार्ग अपघातात युवक ठार

नाशिक। मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.2) मध्यरात्री आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

या प्रकरणी अनिल मोरे (रा. तपोवन) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावर अज्ञात भरधाव वेगातील कारने पादचारी 35 वर्षीय युवकाला धडक दिली. यात डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला.

- Advertisement -

तर संशयित कारचालक कारसह पसार झाला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम आडगाव पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या