Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

हरसूल : चिरापाली शिवारात रानडुकरांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Share

हरसूल : हरसूल जवळील चिरापाली शिवारात रान डुकरांच्या हल्ल्यात एक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान रवींद्र पाडवी (२०, जातेगाव बु.) असे मयत तरुणाचे नाव आहे. हरसूल जवळ चिरापाली हे गाव असून या ठिकाणी आज (दि.२८) सायंकाळी सहा वाजेच्या या शिवारात रान डुक्करांनी हल्ला केला.

या हल्ल्यात जातेगांव बु. येथील शेतकऱ्याचा मुलगा रवींद्र पाडवी यास जीव गमवावा लागला तर दीपक कनोजे (१८) पप्पू मधूकर भोये (३०) दोघे रा. चिरापाली हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

हे सर्व जण भात रोप तयार करण्यासाठी जमिनीची मशागत करत होते. यावेळी रानडुकरांनी हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!