Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदेवळाली कॅम्प येथील पाळदे मळ्यात युवकाची आत्महत्या

देवळाली कॅम्प येथील पाळदे मळ्यात युवकाची आत्महत्या

नाशिक : देवळाली कॅम्पच्या पाळदे मळ्यात एका ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. अमोल आत्माराम पाळदे (३२, रा.पाळदेमळा,दे.कॅम्प) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

पाळदे यांनी सोमवारी (दि.२३) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ कॅन्टोमेंट रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना मृत्यु झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

- Advertisement -

या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार डांगळे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या