Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शहरात एका महिलेसह तरूणाचा मृत्यू

Share
शहरात एका महिलेसह तरूणाचा मृत्यू Latest News Nashik Young Man Dies with Woman in Town

नाशिक : शहरातील वेगवेगळ्या भागात राहणार्‍या दोघांचा मंगळवारी (दि.३१) मृत्यू झाला.त्यात एका २७ वर्षीय महिलेसह १७ वर्षीय दिव्यांग मुलाचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड आणि अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

ज्योती संतोष म्हस्के (२७ रा.शिंदेगाव) यांना मंगळवारी सकाळच्या सुमारास अचानक श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे कुटूंबियांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला.याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत नवीन सचिन जोंधळे (17 रा.विठ्ठलनगर,कामटवाडा) या दिव्यांग मुलास मंगळवारी सकाळच्या सुमारास अचानक झटके आल्याने कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!